महाराष्ट्र वेदभुमी

माजी आ मनोहरशेठ भोईर यांच्या उपस्थितीत आवरे येथील मर्दनगडावर एकविरा आईच्या मंदिराचा लोकार्पण सोहळा



उरण दि १८(विठ्ठल ममताबादे)

स्वराज्यमंदिर संकल्पसिद्धी अभियानांतर्गत महाराष्ट्रातील ऐतिहासिक वास्तूंवरील मंदिरांची पुनर्बांधणीचा निर्धार सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्गसंवर्धन संस्थेने केला आहे. या अभियानाचा भाग म्हणून उरण तालुक्यातील आवरे येथील मर्दनगडावर सह्याद्री प्रतिष्ठान व मर्दनगड संवर्धन समितीच्या पुढाकाराने आई एकविरा मातेचे मंदिर बांधण्यात आले असून या मंदिरामध्ये एकविरा आईची प्राणप्रतिष्ठापना शनिवार दिनांक १६ डिसेंबर रोजी तसेच लोकार्पण सोहळा रविवार १७ डिसेंबर रोजी उरणचे माजी आमदार मनोहशेठ भोईर  व पी.पी. खारपाटील कंपनीचे संचालक राजेंद्र खारपाटील यांच्या शुभहस्ते मोठ्या दिमाखात पार पडला. या प्रसंगी उरण तालुकाप्रमुख  संतोष ठाकूर, महाराष्ट्र भूषण  राजू मुंबईकर, श्रीम. निराताई पाटील सरपंच-आवरे, कुलदीप नाईक, भरत देशमुख, भास्कर मोकल, शैलेश भोईर,संजय गावंड,महेश गावंड, सुरेश गावंड, संदीप गावंड,ग्रामस्थ तसेच अनेक शिवभक्त व एकविरा आईचे भक्त उपस्थित होते. 

कार्यक्रमाची सुरुवात आवरे गावातील शिवप्रतिमेस अभिवादन करून एकविरा आईच्या पालखीने झाली, मर्दनगडावर ध्वजपूजन, मंदिराचा लोकार्पण सोहळा व महाआरती घेण्यात आली. महाराष्ट्र भूषण शिवशाहीर वैभव घरत, शिवशाहीर वैदेही घरत तसेच शिवशाहीर अभिषेक पाटील यांच्या पोवाड्यांनी संपूर्ण गडपरिसरात उत्साह संचारला होता. या प्रसंगी मंदिराच्या उभारणीसाठी सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करण्यात आला.सह्याद्री प्रतिष्ठानचे संस्थापक डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी  स्वराज्यमंदिर संकल्पसिद्धी बद्दल विस्तृत माहिती दिली तर माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कौशिक ठाकूर यांनी सर्वांचे आभार मानले तर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सुरेश भोईर,दिलेश ठाकूर,  शंकर पाटील,गुरुनाथ गावंड,हितेंद्र म्हात्रे,विनोद ठाकूर, दिपेश ठाकूर,धीरज ठाकूर ,राजू गावंड,संतोष म्हात्रे, तुषार म्हात्रे,किशोर गावंड,प्रशांत भोईर,अभिषेक ठाकूर,अलंकार ठाकूर,निलेश ठाकूर,चेतन पाटील,सुहास गोवारी नारंगीकर, संकेत ठाकूर,सुयोग पाटील व कार्यकर्ते यांनी मेहनत घेतली.

Post a Comment

Previous Post Next Post