महाराष्ट्र वेदभुमी

हौशी बैलगाडी शर्यत धानकान्हे आयोजित शर्यतीत संतोष गायकर यांची गाडी प्रथम .


कोलाड (श्याम लोखंडे) 

हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे रोहा यांच्या वतीने भव्य जिल्हा स्तरीय धानकान्हे माती बंदर येथे रविवारी १७ जानेवारी रोजी रायगड जिल्हा स्तरीय बैलगाडी ( छकडा ) जंगी शर्यतींचे आयोजन केले होते. या स्पर्ध्येत रोहा तालुक्यातील उडदवने येथील गाडी मालक संतोष गायकर यांची बैलगाडी अंतिम फेरीत प्रथम तर सेमी फायन मध्ये गणेश वावेदीवाली माणगाव यांची बैल गाडी प्रथम आली असून स्पर्धेत विजयी होणाऱ्या गाडी मालकाला प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते पारितोषिक देऊन त्यांचा हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे यांच्या वतीने सन्मान करण्यात आले.

तालुक्यात बैल गाड्यांच्या शर्यतीचा धुरळा पुन्हा पाहण्यास हौशी रसिक प्रेक्षकांचा उत्स्फुर्तपणे प्रतिसाद लाभलेल्या रोहा तालुक्यातील हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे येथील ग्रामस्थ व हौशी बैलगाडी मालक यांच्या संयुक्त विद्यमनाने या जंगी बैलगाडी शर्यती स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्ध्येत जववळपास पन्नासहून अधिक बैलगाडी हौशी यांनी सहभाग नोंदवला होता तर सदरच्या आयोजित केलेल्या या बैलगाडी शर्यतीला फायनल गटातून प्रथम संतोष गायकर,द्वितीय किशोर सावंत, तृतीय रमेश गव्हाणे तर सेमिफायनल मध्ये प्रथम गणेश कदम, द्वितीय दिनेश रटाटे, तृतीय सुहास कदम,यांच्या बैलगाडीने ही शर्यत जिंकली आहे...

तसेच स्पर्ध्येत गटातून सोडण्यात आलेल्य बैलगाडी शर्यत मध्ये गट क्रमांक एक मधून सहील साबळे प्रथम, देवजी जवरत द्वितीय, राजेंद्र जवके तृतीय,गट क्रमांक दोन मधून मैत्री ग्रूप खारापटी प्रथम , जयेश साळसकर द्वितीय, राहुल बामुगडे तृतीय,गट क्रमांक तीन मधून नामदेव देवकर प्रथम, चैतन्य आमृसकर द्वितीय , निलू पोकळे तृतीय,गट क्रमांक चार मधून राम शेलार प्रथम , राकेश चव्हाण द्वितीय, अजित वरणकर तृतीय,यांच्या बैलगाड्यानी शर्यत जिंकली त्याच बरोबर अतिशय रंगदार आणि मजेदार शर्यतीचा आनंद रसिक प्रेक्षकांना मिळाला तो म्हणजे कॉटर फायनलमध्ये या गटात राजू वाघमारे प्रथम, अन्वी खेडेकर द्वितीय ,तर कौशल मोरे तृतीय ,यांच्या बैलगाडीने कमालीची शर्यत जिंकली. सेमी फायनल मध्ये अजय पवार, संदेश भोईर,साईल कळव, गणेश कदम, दिनेश रटाटे,सुहास कडव यांच्या यांच्याबैल गाडी जोडीने बाजी मारली.

तसेच या शर्यतीत बैल गाड्यांचे एकूण आठ गट तयार करण्यात आले होते तर शर्यतीत सर्वांच्या नजरा लागलेल्या अंतिम फेरीत भुर्रर्र गाडीचा धुरळा उडवत संतोष गायकर उडदवने यांनी फायनलची शर्यत जिंकली, तर किशोर सावंत व्दितीय ,आणि रमेश गव्हाणे यांच्या बैलगाडी जोडीने अंतिम फेरीत  क्रमांक पार करत हे विजेतेपद पटकावले.

हौशी बैल गाडी शर्यत धानकान्हे यांनी आयोजित केलेल्या माती बंदरावर येथील हौशी ग्रामस्थ व बैलगाडी हौशी नागरिकांनी या स्पर्धांचे आयोजन केले होते याला हौशी रसिकप्रेशकांनी भरभरून प्रतिसाद देत याचा आनंद लुटला तर यांचा शुभारंभ व बक्षिस वितरण सांगडे गावचे सामाजिक कार्यकर्ते तथा हौशी कल्पेश शिंदे,नामदेव जाधव, गावचे पोलिस पाटील पांडुरंग कचरे,यांच्या शुभहस्ते करण्यात आले यावेळी आयोजक नामदेव देवकर,दिलीप गायकवाड,संजय आंबेतकर,आदेश गायकवाड,आशोक देवकर,कल्पेश गायकवाड,सुरत आंबेतकर,निलेश देवकर,संयोग गायकवाड,कृतिक आतोणकर,प्रशांत गायकवाड, साहिल साबळे,ओंकार महाडिक,आदित्य गायकवाड,नितेश गायकवाड आदी मान्यवांसह बैल गाडी मालक तसेच हौशी रसिक प्रेक्षक बहुसंख्येने उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post