रोहा - विशेष प्रतिनीधी :-
विजयी उमेदवाराला ग्रामसभेत सांगितले तुम्ही आहात पराभूत
मागील नोव्हेंबर महिन्यात झालेल्या विरझोली ग्रामपंचायतिच्या निवडणूकित विजयी घोषित करण्यात आलेल्या पुष्पा वाघमारे यांची अन्य विजयी उमेदवारां समवेत गावा गावात पुष्पहार घालून विजयी मिरवणूक काढण्यात आली होती... मात्र ग्रा. प.च्या पुढील बैठकीत त्यांना तुम्ही पराभूत असल्याचे सांगण्यात आल्याने वाघमारे यांनी जिल्हाधिकारी रायगड यांच्याकडे फेरमतमोजणीची केली मागणी केली आहे... या प्रकरणी काय निकाल लागतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
नोव्हेंबर महिन्यात रोहा तालुक्यातील १२ ग्राम पंचायतीच्या निवडणुका पार पडल्या...या निवडणुकीत ग्रामपंचायत विरझोली मध्ये प्रभाग क्रमांक २ मधून सदस्य पदासाठी अनु. जमाती या राखीव प्रवर्गातून नामनिर्देशन पत्र अन्वये पुष्पा सुनील वाघमारे रा. मुचने आदिवासीवाडी यांनी निवडणूक लढवली... त्यांचं विरोधात गीता तुकाराम वाघमारे या उभ्या होत्या... अटीतटीच्या लढतीत मतमोजणी पूर्ण झाल्यावर पुष्पा सुनील वाघमारे यांना ३४० मतं मिळाली तर विरोधी उमेदवार गीता तुकाराम वाघमारे यांना ३०९ मते मिळाली तसेच 8 मत नोटाला पडली, मतमोजणी केंद्रा बाहेर लाऊड स्पीकर वर पुष्पा वाघमारे विजयी झाल्याचे जाहीर करण्यात आले...यावेळी विरोधी उमेदवार गीता तुकाराम वाघमारे या पराभूत झाल्याने तेथून निघून गेल्या... विजयी उमेदवार पुषा वाघमारे यांच्या गळ्यात विजयी पुष्पहार घालून खांद्यावर उचलून आनंदी वातावरणात बाहेर आणले...विजयी उमेदवार पुष्पा वाघमारे यांना रोहा पोलिसांकडून १४९ ची नोटीस बजावण्यात आली...निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन दिवसात विजयी झाल्याचे पत्र देण्यात येईल असे त्यावेळी त्यांना सांगण्यात आले...
उमेदवार पुष्पा वाघमारे यांनी फेरमत मोजणीची जिल्हाधिकाऱ्यांकडे केली मागणी
विजयी उमेदवार पुष्पा सुनील वाघमारे यांची अन्य विजयी उमेदवार यांच्या समवेत गावा गावात पुष्पहार घालून विजयी मिरवणूक काढण्यात आली... जागोजागी विजयी उमेदवारांचे स्वागत करण्यात आले... निवडणुक निकालानंतर विरझोली ग्राम पंचायतीची पहिली ग्रामसभा १७ नोव्हें. २०२३ रोजी संपन्न झाली, यावेळी मीटिंगमध्ये पुष्पा वाघमारे यांना तुम्ही निवडणुकीत पराभूत झाल्या असून तुमची विरोधक उमेदवार गीता वाघमारे या निवडून आलेल्या आहेत असे सांगण्यात आले...पुष्पा वाघमारे यांनी रोहा तहसिल कार्यालयातून निवडणूक निर्णय प्रक्रियेची कागदपत्रे मागविली, त्यामध्ये ३४० मते गीता तुकाराम वाघमारे यांना पडली असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले... या विरोधात पुष्पा वाघमारे यांनी २८ नोव्हें. २०२३ रोजी रायगड जिल्हाधिकारी व रोहा तहसिल कार्यालयात तक्रारी अर्ज दाखल केला आहे...यामध्ये निकाल हा संशयास्पद असून ईवीएम मशीन मधील मतांची पुन्हा फेरमतमोजणी करून निपक्षपणे चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे... या प्रकरणी काय निकाल लागतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
