महाराष्ट्र वेदभुमी

जिल्हास्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलन रोहा पुगाव येथे १० डिसें.रोजी आयोजन

  .


कोलाड (श्याम लोखंडे) 

रोहा तालुक्यातील मौजे पुगाव येथे रविवारी १० डिसेंबर रोजी दुपारी १ वाजता "गंध चंदनाचा"जिल्हास्तरीय निमंत्रितांचे कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे...

स्व. हरिभाऊ लक्ष्मण म्हसकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ श्री.शंकरराव म्हसकर सामाजिक संस्था पुंगाव व कोकण मराठी साहित्य परिषद शाखा रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने या कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे तसेच या संस्थेच्या वतीने क्रिडा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे...

संस्थेचे संस्थापक शंकरराव म्हसकर यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन स्व.हरिभाऊ म्हसकर सार्व.वाचनालय व ग्रंथालय सामजिक सभागृह पुगाव येथे आयोजित करण्यात आले आहे...यावेळी एल बी पाटील महाराष्ट्र राज्य साहित्यिक व सांस्कृतिक मंडळ सदस्य ,सुधीर शेठ जिल्हाध्यक्ष कोकण मराठी साहित्य परिषद, अ. वि. जंगम जिल्हा समन्वय कोमसपा , सुखद राणे जिल्हा प्रतिनिधी कोमसपा,सौ सध्या दिवकर अध्यक्ष कोमसपा रोहा,विजय दिवकर कोमसपा सचिव रोहा, सुधीर क्षीरसागर सह सचिव रोहा,निवास थळे कोमसपा सदस्य रोहा यांच्या प्रमूख उपस्थीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे.. यासाठी सर्व कवी कलाकार यांनी उपस्थीत राहण्याचे आवाहन केले आहे...अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष गणेश म्हसकर यांनी केले..

Post a Comment

Previous Post Next Post