रायगड ( श्याम लोखंडे)
माऊलीला प्रदक्षिणा प्रशासकीय यंत्रणा सज्ज
'ज्ञानियांचा शिरोमणी वंद्य जो का पुज्यस्थानी, चिंताकांचा चिंतामणी, ज्ञानोबा माझा...' असे म्हणत खांद्यावरिल भगव्या पताका उंचावत वैष्णवांची मांदियाळी गेली काळ पासून आळंदी आलंकापुरित मावऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी पायी दिंडी सह भाविक लाखोंच्या संख्येने या समाधी संजीवनी सोहळ्यासाठी आळंदीत दाखल झाले असून कार्तिकी एकादशी निमित्ताने लाखो भाविकांच्या वतीने मोट्या भक्ती भावाने माऊलीला प्रदक्षिणा व संजवणी समाधी सोहळ्याकरीता या ठिकाणी स्थानिक पालिका यंत्रणेसह आरोग्य व पोलीस यंत्रणा सज्ज झाली आहे...
पंढरपुरातील विठ्ळाच्या पादुकांसह संत नामदेवराय, पुण्डलिकराय यांच्या पालख्या दाखल झाल्या आहेत, तर कोकण भागातून ठाणे ,रायगड, रत्नागिरी ,तसेच मुबई,या अनेक जिल्ह्यातून अधिक दिंड्यांचे आगमन झाले आहे,हातात भगव्या पताका कपाळी बुक्का, केसरी गंध, गळ्यात तुलशीच्या माळा अन मुखातून 'ज्ञानोबा-तुकारामा'चा जयघोष टाळ मृदुंगाच्या गजरात लाखो भाविकांची असंख्य पावले आपल्या घरान्यातिल अविरतपणे व परंपरेने चालत आलेली संप्रदायिक वारी माऊलीचरणी समर्पित करण्यासाठी आळंदी अलंकापुरीत येऊन दाखल होत भक्तीचा तसेच या सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी आले आहेत...
नाशिक अहमदनगर,नाशिक औरंगबाद, बिड ,शिरूर,कोकण प्रांतातून कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वानन्द सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या कृपा आशीर्वादने व त्यांच्या पाऊलावर पाऊल टाकत ठाणे रायगड व रत्नागिरी येथील त्यांचे अनुयायी विविध फडकरी यांच्या प्रेरणेने सर्वाधीक म्हणजे अधिक पायी दिंड्या आळंदीत या संजीवनी समाधि सोहळ्यासाठी दिंडी सह लाखोंच्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत...
ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर | मुखी म्हणता चुकतील फेरे || होतील संतांचिया भेटी | सांगू सुखाचिया गोष्टि || आळंदी अलंकापुरीत माऊलीच्या प्रेरणेने संतांची मांदियाळी ने सारी आळंदी अलंकापुरी माऊलीच्या जयघोषात दूम दुमत आहे, चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू, संजीवनी समाधी सुख सोहळा डोळे भरून पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येने वारकरी सम्प्रदायिक भाविक व भक्तगण दाखल झाले असून दरम्यान कार्तिकी एकादशी निमित्ताने गेली तीन दिवसांपासूनच पहाटे पासूनच माऊलींच्या दर्शनबारीच्या रांगेतही भाविकांची गर्दी ओसंडून लागली असली तरी महाद्वारातून बाहेर पडण्यासाठी मार्ग आहे...या ठिकाणी धातुशोधक यंत्रना बसविण्यात आली आहे. मंदिरासह आळंदीत ठिकठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा देखील बसविण्यात आली आहे... तसेच आळंदी नगर परिषदेसह कर्मचारी व पुणे जिल्हा पोलीस यंत्रणा व आरोग्य यंत्रने सह विविध यांत्रना देखील या साठी कमालीची सुसज्य झाली असून भाविकांना उत्तम प्रकारे शासकीय यंत्रणेद्वारे सहकार्यातुन सहकार्य करत असून भक्तग्णांना माऊलीचे दर्शन घडत आहे...
चला आळंदीला जाऊ ,ज्ञानेश्वर डोळा पाहू l होतील संतांचिया भेटी ll प्रवचनकार कीर्तनकार विणेकरी,टाळकरी फडकरी संत मंडळी यांची गळाभेट भेटाभेटीचा अलंकापुरीत देव धर्म समाज मानवता यांची नीती मूल्यांची जोपासना जाणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतील वारकरी संप्रादय ,मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll कोकण वाशियांचे श्रद्धास्थान गुरुवर्य स्वा. सुख निवासी अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे गुरुवर्य धोंडूबाबा कोल्हटकर यांच्या कृपा आशीर्वादाने कोकण प्रांत रायगड मधून ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात व टाळ मृदुंगाच्या गजरात हजारो दिंड्यांचे आळंदी आलंकापुरीत बुधवार,गुरुवारी दाखल झाल्या आहेत,
भाविकांसाठी दर्शनाची रांगच रांग लागली आहे तर भक्ती सोपान पुलावरून इंद्रायणीनदीच्या पलीकडील दिशेने दिली गेली आहे. मंदिरात प्रवेश करत जाणारे भक्त गण संयम राखत दर्शन करत आहेत तर काही तासाचा कालावधी समाधी दर्शनासाठी लागत आहे. सुरक्षेच्या कारणास्तव मोठा बंदोबस्त देऊलवाडा मंदिर परिसरात असून वाहतूक व्यवस्थेसाठी स्वतंत्र नेमणूक केली असल्याचे दिसून येत आहे.आळंदीत इंद्रायणीत भाविकांच्या स्नान घाटावर देखील स्वतंत्र यंत्रणा व्यवस्था व स्वच्छता राबवली जात आहे .
यावर्षात पावसाची सरासरी कमी झाल्याचे दिसत असून त्यामुळे इंद्रायणीला पाणी देखील कमी प्रमाणात असल्याचे दिसून येत आहे मात्र ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वारकरी स्थान करतात त्या गरुड स्तंभ ते पुंडलिक मंदिर परिसरात आधीच पाण्याची पातली असल्याने वारकरी भाविकांनी स्नान करण्यासाठी खोलात जाऊ नये अश्या सूचना यंत्रणेकडून देण्यात येत आहेत. गेली तीन दिवस वारकरी आळंदीत दाखल झाले असून या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी आज एकादशी निमित्ताने तीन चार लाखाहून अधिक भाविक जमा होण्याची शक्यता वर्तवली जात असून मात्र इंद्रायणीत आंघोळीला गेलेल्या भाविकांना डुबकी मारावी लागनार आहे तर माऊलीच्या संजीवनी समाधी सोहळ्यासाठी व दर्शनासाठी भाविकांच्या सेवेसाठी येथील यंत्रणाही आधीक सज्ज झाली आहे..
आळंदी - राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रापैकी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी येथे मंगळवार (दि.०५/१२/२०२३) ते (दि.१२/१२/२०२३) रोजी दरम्यान संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज ७२६ वा संजीवन समाधी सोहळा व कार्तिकी यात्रा उत्सव आहे. शनिवार (दि. ९) रोजी कार्तिकी एकादशी तर सोमवारी (दि.११)संजीवन समाधी दिन आहे... हा सोहळा उत्साहात, भक्तिमय वातावरणात, शांततेत निर्विघ्न पार पडवा याकरिता पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडुन मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे... तसेच भाविकांच्या आणि स्थानिकांच्या वाहनांसाठी पासची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती आळंदी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सांगीतले...
