कोलाड (श्याम लोखंडे)
ओबीसींची जातीनिहाय जनगणना करा,एकही टक्का कमी होता कामा नये,
मंडल आयोगाच्या अनुषंगाने केवल २७ टक्के आरक्षण ओबीसी समाजाला मिळाले आहे.परंतु ते आता सरळ सेवा भरतीत १९ टक्केच मिळत आहे.त्यामुळे ओबीसीला पुर्णपणे २७ टक्के आरक्षण मिळावे.मुळातच २७ टक्के आरक्षण कमी आहे.जातनिहीय जनगणना झाल्यास ओबीसीची संख्याबळ कळेल.ओबीसीचा एकही टक्का कमी होता कामा नये. उत्तर रायगड जिल्ह्यातील ९ तालुक्यातील कुणबी समाजाला दाखले द्या असे महाराष्ट्र राज्य कुणबी समाज उच्चाधिकार समितीचे माजी ताठा ओबीसी नेते अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले...कुणबी दाखला प्रश्न रायगड जिल्ह्यात शासनाने लादलेल्या अटी शर्ती मुले येथील कुणबी समाज बांधवांना १९६७ चा पुरावा नसल्याने मिळत नाहीत त्यामुळे रायगड जिल्ह्यातील ९ तालुक्यात शासनाने कुणबी समाजाचे दाखले अडविण्यात येत आहेत.या समाजातील समाज बांधवांचे कुणबी दाखले देण्यात यावे अशी मागणी शासनाकडे गेली अनेक वर्षापासून कुणबी समाजोन्नती संघ मुंबई तसेच ग्रामीण शाखेच्या वतीने केली आहे.तसेच अनेकदा सरकारला याबाबतचे निवेदन अथवा मागणी पत्र देखील दिले आहेत मात्र आजतागायत त्यावर कोणतीही कारवाही शासनाने केली नाह त्यामुळे सामाजिक,शैक्षणीक,नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया मागास राहीलो आहोत त्यामुळे आता यासाठी पुन्हा एकदा रायगड जिल्ह्यातील कुणबी समाज तसेच कुणबी युवक संघटना आक्रमक झाले असल्याचे दिसून येत आहेत...यावेळी शिवराम महाबळे, मारूती खांडेकर सर , विठोबा म्हसकर,बबन म्हसकर, महेश बामुगडे,आदी समवेत बोलत होते.पुढे यावेळी शंकरराव म्हसकर यांनी अधिक माहिती देताना सांगीतले की आपण उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असताना संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करुन कुणबी समाजाचे प्रश्न जाणुन घेत या बाबत शंकरराव म्हसकर समिती अहवाल शासनाच्या पटलावर सादर केला आहे त्यावर कित्येक वर्ष उलटून गेली कित्येक सरकारे आली आणि गेली मात्र आजतागायत कुणबी समाज बांधवांना समाधान कारक न्याय मिळाला नाही त्यामुळे येथील मुलांना शैक्षणीक लाभ मिळत नाही...
रायगड जिल्ह्यातील रोहा,मुरुड,सुधागड,पेण, अलिबाग,कर्जत, खालापूर, पनवेल, उरण या ९ तालुक्यातील कुणबी समाजासंबधीत दाखले शासनाने लादलेल्या अटी शर्ती मुले अडवले जात आहे.हा सर्व समाज कुणबी आहे. कुणबी समाज उच्चाधिकार समिती चे अध्यक्ष असताना तसेच सर्वात जुनी १९२० सालापासून स्थापन असलेले कुणबी समाजोन्नती संघ मुंबई यांच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील ९ तालुक्यातील कुणबी समाजाला दाखले देण्यात यावे अशी मागणी कुणबी समाज नेते शंकरराव म्हसकर यांनी केली होती.तसेच कुणबी समाजाच्या विविध प्रश्नाबाबत तात्कालीन मुख्यमंत्री यांच्या सोबत चर्चा करीत विविध मागण्यांचे निवेदन देखील दिले असल्याचे म्हणाले...
कुणबी समाजाला दाखले देताना शासनाने महसुली पुरावे ही अट रद्द करुन मोघल, इंग्रज, निजाम व पेशवे काळातील पुराव्यांच्या आधारे व गृहतपासणी करुन दाखले देण्यात यावे अशी मागणी आपण केली असल्याचे शंकरराव म्हसकर यांनी शेवटी सांगितले...