महाराष्ट्र वेदभुमी

मुंबई ते बागमांडला,श्रीवर्धन बस सेवा पूर्ववत करण्यासंदर्भात एस.टी. महामंडळाला निवेदन



माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

दि.३०/११/२०२३ 

युवा प्रतिष्ठान रायगडच्या वतीने निवेदन 

कित्येक वर्ष मुंबई ते बागमांडला,श्रीवर्धन एस.टी.बस सेवा नियमितपणे चालू होती,पण काही महिन्यांपासून सदर बस महामंडळा कडून बंद करण्यात आली...

म्हसळा,श्रीवर्धन तालुक्यातील बहुतांशी चाकरमानी मंडळी मुंबईमध्ये नोकरी निमित्ताने मुंबईला ये-जा करत असतात...सदर बस बंद झाल्यामुळे दोन्ही तालुक्यातील चाकरमान्यांना सणासुदीला गावाकडे येण्यासाठी फार त्रास सहन करावा आहे.सदर बस बंद झाल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे तसेच खाजगी वाहतूकदारांच्या मनमानीला बळी पडावं लागत आहे.खाजगी वाहतूकदार २,३ पट भाडे आकारत आहेत...

 बस पुन्हा चालू करण्यासाठी "युवा प्रतिष्ठान रायगड" या संघटनेच्या वतीने दि.३०/११/२०२३ रोजी मुख्य प्रबंधक,महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या मुंबई येथे अधिकार्यांना बस सेवा पुर्ववत करण्या संदर्भात निवेदन देण्यात आले; त्या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष मनोहर जाधव,सचिव अमर खेरटकर,उपाध्यक्ष गणेश शिंदे,सहसचिव प्रदिप चोरगे,संतोष जाधव उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post