महाराष्ट्र वेदभुमी

पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान,अलंकापुरीत होतील संतांच्या भेटी ,चला आळंदीला जाऊ , ज्ञानेश्वर डोळा पाहू,

 


कोलाड (श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर ) 

ग्यानबा तुकोबांच्या गजरात संभे कोलाड येथून पायी दिंडीचे आळंदीकडे प्रस्थान,

देव,धर्म,समाज,मानवता यांची अनाधी काळापासून नीती मूल्यांची जोपासना जपणारे म्हणजे भारतीय संस्कृतीतील समजला जाणारा वारकरी संप्रादय!


मार्ग दाऊनीया गेले आधी l दयानिधी संत ते ll 

तेणेचि पंथे चालो जाता l न पडे गुंथा कोठे काही ll 

कोकण वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान स्वा.सुख निवासी वै.गुरुवर्य अलिबागकर महाराज यांच्या प्रेरणेने गुरुवर्य गोपालबाबा वाजे यांच्या कृपा आशीर्वादाने रायगड भूषण ह.भ.प. नारायण तात्या (आण्णा) दहिंबेकर, आणि रायगड भूषण वै. नारायण बाजी महाबळे यांच्या संकल्पनाने श्री संत ज्ञानेश्वर महाराज सत्संग वारकरी सेवा मंडळ संभे कोलाड यांच्या कार्य प्रणालीने सुरु असलेला दिंडी सोहळा सन २००० सालापासून चालत आलेला अविरत पायी दिंडी सोहळा ह्या सोहळ्याच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील अनेक भाविक मंडळी व वारकरी एकत्रित येऊन चांगल्या विचारांची देवाण घेवाण करून  एक आनंद निर्माण देतो, समाज्यात वावरण्यासाठी उपयोगी असे आपल्याला देह धर्माशी निगडित राहून (तस्मोमा जोतिदेर्ग्मये) अखंड नामस्मरणाच्या व कीर्तन प्रवचन प्रबोधनाच्या मध्यानातून श्री संत ज्ञानोबा तुकोबांच्या जय घोषात टाळ मृदंगाच्या गजरात ही गुरुवर्य सद्गुरू अलिबागकर महाराजांचा पालखी रथ पायी दिंडी गुरुवारी ३० नोव्हे रोजी रोहा संभे कोलाडहून आळंदीकडे या दिंडीचे प्रस्थान प्रस्थान झाले आहे...दरम्यान हि पायी दिंडी सोहळा थेट श्री संत ज्ञानेश्वर महाराजांचा समाधी सोहळा संपन्न करीत या दिंडीची सांगता होणार आहे...


गेली कित्येक वर्ष अत्यंत खडतर प्रवासातून तसेच ताम्हानी घाटातून पायी चालत जाणारी हि दिंडी भैरवनाथ मंदिर संभे कोलाड येथून कलश पूजन पाद्य पूजन गुरूवर्य स्वा.सुखनिवासी अलीबागकर महाराज गुरुवर्य गोपाल बाबा वाजे यांचे प्रतिमा पूजन  टाळ मृदूगांच्या व हरिनामाच्या गजरात या पायी दिंडीचे प्रस्तावना होणार असून  सुतारवाडी विळे , निवे जामगाव,बापूजी मंदिर घोटवडे,पुनावले ,पुनवले ते देहू आळंदी सोमवारी ६ डिसें रोजी आळंदी आलंकापुरित ज्ञानोबा माऊलींच्या समाधिस प्रदीक्षणा अर्पण करून भोईराज धर्म शाळेत या निवासस्थानी  हि दिंडी भक्तिमय वातावरणात समाधी संजीवनी सोहळा पर्यंत स्थान मांडणार आहे,दिंडी स्थानी पहाटे संभे येथे काकडा आरती कलश पूजन गुरूवर्य महाराज यांच्या पालखी रथाचे पूजन करत ही दिंडी मार्गस्थ झाली तसेच संभे ते कोलाड दरम्यान या पालखी रथाचे तसेच दिंडीचे व दिंडीचे नेतृत्व मार्गदर्शक रायगड भूषण हभप नारायण महाराज दाहिंबेकर यांचे भक्तीमय वातावरणात दर्शन घेत स्वागत करत या दिंडीला पुढें मार्गस्थ करण्यात आले...

गेली तेवीस वर्षे अविरतपणे चालत आलेल्या या दिंडी सोहळ्यात गुरुवर्य रायगड भूषण ह.भ. प. ना. ता. दहिंबेकर, रुपेश शेळके, पंचपदी, गणेश नलावडे,नथुराम उतेकर,रायगड भूषण पुरुषोत्तम महाराज पाटील ,ओंबले, गणेश दिघे, यांचे कीर्तन प्रवचन रुपी सेवा या दिंडीत होणार आहे... तसेच पंचकमिटी व दिंडीचे अध्यक्ष तुकाराम बांधल, सेक्रेटरी पांडुरंग सानप, जितेंद्र दहिंबेकर,सह सह अनेक पदाधिकारी मंडळी यशस्वीतेसाठी अथक परिश्रम घेत आहेत....

Post a Comment

Previous Post Next Post