रोहा/शहानवाज मुकादम
दि:२७/११/२०२३
बेजबाबदार ग्रामसेवकच हजर नसल्याने या कार्यक्रमाची ग्रामस्थांना माहिती न दिल्याने कारवाईची मागणी...
रोहा तालुक्यातील खैरेखुर्द ग्रामपंचायत कार्यालया समोर भारत सरकार च्या विकसित भारत संकल्प यात्राचा नियोजन ग्रामसेवक यांनी केला नसुन स्वतःच गैरहजर आसलेने सदरचा यात्रा रथाला परत पाठवून बेजबाबदार ग्रामसेवक व संबंधितांविरुद्ध कारवाई ची मागणी नागरिकांकडून होत आहे...
विशेष म्हणजे या कार्यक्रमात हिंदी कम इंग्रजीत माहिती देत असल्याने सामान्य शेतकऱ्यांपर्यंत ह्या योजनांची माहीतीच न पोहचणे? गावात यात्रा रथ गेला म्हणून केवळ छायाचित्रच कारणे?मराठी भाषेत माहिती न देणे? हाच प्रकार समोर आलेने नागरिक हैराण...
भारत सरकार च्या फलॅगशिप योजनांचा लाभ लक्षियत लाभार्थ्यापर्य॔त वेळेत पोहोचावेत याची खात्री करण्याच्या उद्देशाने विकसित भारत संकल्प यात्रा ही देशव्यापी मोहीम केंद्र शासनाकडून आखण्यात आले आसुन ही यात्रा दि:१५नोव्हेंबर २३ ते २६ जानेवारी २०२४ या कालावधीत पार पडणार आहे...
या विकसित भारत संकल्प यात्रा योजनेच्या रथाला रायगडचे जिल्हाधिकारी डॉ.योगेश म्हसे यांनी हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ केले होते...
विविध योजनेंतर्गत पात्र आसलेल्या परंतु, आतापर्यंत लाभ न घेतलेल्या लोकांपर्यंत पोहचणे, माहितीचा प्रसार आणी योजनांबद्दल जागृकता निर्माण करणे, नागरिकांशी संवाद वैयक्तिक कथा,अनुभव शेअरिंग द्वारे सरकारी योजनांवर लाभार्थ्यांशी संवाद साधणे, यात्रे दरम्यान निश्चित केलेल्या तपशिला द्वारे लाभार्थ्यांची नोंदणी करणे ही विकसित भारत संकल्प यात्रेची मुख्य उद्दिष्टे आहेत...
असे आज ग्रुप ग्रामपंचायत खैरेखुर्द कार्यालय समोर वेळे ११,च्या सुमारास सदर चा यात्रा रथ आला आसुन त्या सोबत आंगणवाडी सेविका,आशा सेविका,आरोग्य कर्मचारी,चणेरा कोतवाल,ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित आसुन ग्रामपंचायत खैरेखुर्द /पंचायत समितीमधील करुन कोणतीही नागरिकांना माहिती दिलेली नाही...
खैरेखुर्द ग्रामपंचायतचे बेजबाबदार ग्रामसेवक ही हजर नसलेने कोणतेही नियोजन या कार्यक्रमाचे नसलेने नागरिकांकडून संबंधित प्रशासनावर नाराजी व्यक्त करण्यात आली असून ग्रामपंचायतचे सरपंच श्री मुजम्मील गीते यांना याबाबत कोणतीही माहीती नसुन ग्रामसेवक यांनी सकाळी मेसेज केला परंतु कोणते ही नियोजन केलेले नाही...
तसेच सदर विषयी ग्रामपंचायत ला कोणतेही पत्र व्यवहार नसुन ग्रामपंचायतच्या शेजारील उपस्थितीत श्री अब्दुल कादीर पितु,ईफ्तिखार धनसे, कमाल धनसे,जहीर धनसे,मुख्तार धनसे,इसहाक पेडेकर,कासीम पेडेकर हे उपस्थितीत होते...
सदर विषयी गावोगाव आणि वाड्या वस्त्यांना कोणत्याच योजनांची माहिती/लाभ मिळत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली असुन सदरचा यात्रा रथ सरपंच ग्रामस्थांकडून परत पाठविण्यात आला...
तसेच संबंधित अधिकारी आणि ग्रामसेवक यांच्याविरुद्ध मा.जिल्हाधिकारी रायगड आणी राजिप अलिबाग, मा. तहसीलदार रोहा,मा.गट विकास अधिकारी रोहा यांच्याकडून कारवाई करण्यात यावी आशी मागणी होत आहे...