रोहा तालुक्यातील खांब पालदाड मार्गावर अपघातांची मालिका सुरूच उडदवणे बाहे दरम्यान तिहेरी अपघात घडल्याने सर्वत्र एकच संतापाची लाट उसळली आहे हा मार्ग जणू काही आता प्रवाशी नागरिक यांच्या जीवावर बेतू लागला आहे तसेच या मार्गावर दररोज होत असलेले किरकोळ अपघात एक ना एक दिवस प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्याच जीवावर बेतू शकते असा संताप येथील नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे...
मुंबई गोवा महामार्ग तसेच कोलाड रोहा चणेरा राज्य मार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब पालदाड हा मार्ग अत्यंत अरुंद आणि धोकादायक म्हंटले तर काही वावग ठरणार नाही त्यामुळे गेली कीत्येक वर्षापासून या मार्गाचे दुरुस्तीचे काम रखडले आहे त्यामुळे सर्वसामान्य प्रवासी नागरिकांना अपघाताला सामोरे जावे लागत आहे...त्यात अनेक खड्डे आणि अनेक धोकादाक वळणे अधिक मार्गाच्या दुतर्फा मार्गाला वाढलेली काटेरी झुडपे त्यामुळे पुन्हा बाहे उडदवणे या दरम्यान तीहेरी पघात घडला असून यात तीन जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे समजले .
सदर या विषयाची सविस्तर माहिती अशी की देवकान्हे कडून उडदवणे कडे येणारी मिनिडोर रिक्षा तसेच उडदवणे कडून देवकान्हे दिशेकडे जाणारे एका पाठोपाठ दोन दुचाकी वाहने यांच्यात हा जोरदार तिहेरी अपघात घडला असे समजते परंतु मिनिडोर चालकाने एका दुचाकीला ठोकर देत पुढे दुसऱ्या दुचाकी स्वरावर धडकल्याने हा तिहेरी आपघात घडला असून यात दुचाकीवरून प्रवास करणारे पती पत्नी तसेच दुसऱ्या दुचकीस्वाराला धडक दिल्याने यात तिघेजण गंभीर जखमी झाले असून एकाचे पाय फॅक्चर झाले असून तिन्ही गाड्यांचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे...
गेली अनेक वर्ष खांब पालदाड मार्गाचे रुंदीकरण व दुरुस्तीचे काम रखडले आहे याला जबाबदार कोण हाच प्रश्न साऱ्यांना पडला आहे त्यामुळे मार्गालगत नडवली, तळवली तर्फे अष्टमी, चिल्हे, धानकान्हे, देवकान्हे,बाहे, उडदवणे, ही गावे जोडली गेली आहेत त्यामुळे येथून शाळेतील विद्यार्थी तसेच नोकरदार वर्ग शेतकरी आणि रोहा कोलाड खांब येथे बाजार खरेदीसाठी जा ये करणारे नागरिकांचा मुळात हा एकमेव रहदारीचा मार्ग समजला जातो मात्र याच मार्गावरील देवकान्हे ते खांब मार्गाची तर अक्षरशः दैना अवस्था निर्माण झाली आहे तर एक वाहन आली तर दुसरी वाहन चालकाला मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे त्यामुळे गेली अनेक वर्षे या मार्गाची बोंब त्यात होत असलेले विचित्र आपघात या बाबत कोण ऐकणार हाच प्रश्न सर्वत्र उपस्थित केला जात आहे...रायगडच्या राजकारणात गेली पंचवीस वर्ष कायम राज्य सरकारच्या मंत्री मंडळात येथील आमदारांचा मंत्री म्हणुन समावेश आहे हे नाकारता येत नाही मात्र शिवरायांच्या राजधानीच्या जिल्हयातील ग्रामीण भागातील जनता ही आजही काही मूलभूत सोयी सुविधांपासून तसेच विकासांपासून वंचित आहेत ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे हे नाकारता येत नाही कारण कोलाड खांब देवकान्हे धामणसई या भागात आजही नागरिकांना पुरेशा मूलभूत सोयी सुविधा नसल्याने दिसून येत आहे त्यात गेली वर्षभर या मार्गासाठी स्थानिक पुढारी नेते मंडळी एकटवली होती बैठका वर बैठका झाल्या परंतू त्यात निष्पन्न काय झाले हे गुलदस्त्याच तसेच काही अधिकारी येऊन खांब देवकान्हे या मार्गाची पाहणी करत कोणी मोजणी केली तर मार्गाचे रुंदीकरण होत आहे यासाठी कोणी दुर्बीण सर्वे केला तर नंतर एकच बोंब सुरू झाली काहीची शेती जाईल गावातील घरे जातील रस्त्यालगत असलेले मंदिर जात आहेत हा मार्ग तीस ते बत्तीस फूट रुंद होणार या चर्चेला उधाण आले होते मात्र यावर कार्यतत्पर वरिष्ठ नेते मंडळी यांनी तसेच संबधीत खाते यांनी तद्नंतर कोणती भूमिका बजावली याचे ही गणित आजतागायत कोणाला कळले नाही त्यामुळे गुपित काय काय आहे याची दखल घेणे गरजेचे आहे...
उदडवणे पालदाड पुलाकडे जाणारा मार्ग गल्लीतील खड्डे पुन्हा जैसे थे तसेच अर्धवट त्यात दुतर्फालगत काटेरी झुडपे या मार्गावर वाढली काटेरी झुडपे न काढल्याने वळणावर होत आहेत आपघात याला जबाबदार कोण ? असा सवाल येथील ग्रामस्थ नागरिक करत आहेत या मार्गावरील अर्धवट काढलेली काटेरी झुडपे आता प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतली आहेत धोकादायक वळणं व भयानक वाढलेली काटेरी झुडपे यामुळे समोरील येत असलेले वाहनं दिसत नसल्याने दररोज आपघातास कारणीभूत ठरत आहेत मात्र या मार्गावर नव्याने स्थानिक लोक प्रतिनिधी तसेच आमदार खासदार मंत्री कोणती भूमिका घेतात हे पाहावे लागणार आहे...
प्रतिक्रिया
मागील पाच वर्षांपूर्वी खांब निडी तर्फे अष्टमी या मार्गाचे काम मुख्यमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आले परंतु ते काम निडी तर्फे अष्टमी ते देवकान्हे या दरम्यान केले गेले देवकान्हे खांब हे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील काम तसेच नाल्यावरील साकव हे काम करण्यास विलंब झाला आहे त्यामुळे हा मार्ग सध्या धोकादायक बनला आहे रायगडात अनेक ठीक ठिकाणची रस्त्यांची कामे विविध योजनेंतर्गत केली जातात मात्र एक खांब पालदाड मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे मागील वीस ते पंचिविस वर्षाचा आढावा घेतला तर एकही वर्ष असा गेला नाही की मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील मंत्री नाही तरी देखील विकासापासून हा भाग वंचीत राहिल्याचे समोर येत आहे,त्यामुळे या मार्गाच्या अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे,तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे...... एकनाथ लोखंडे सामाजिक कार्यकर्ते