कोलाड (श्याम लोखंडे)
वरसगाव येथे उत्सपूर्त प्रतिसाद.
रोहा तालुका कुणबी समाज आता जातीचा दाखला आवश्यक भासत असल्याने हा समाज जागो जागी चांगलाच एकटवला असल्याचे दिसून येत असून तालुक्यात विभाग स्तरावर त्यामुळे सर्वसामान्य कुणबी समाज बांधवांना कोलाड विभागीय कुणबी ग्रुप चे अध्यक्ष संदेश लोखंडे सह कार्यकारणी कुणबी समाज बांधवांना गठीत करण्यासाठी अग्रेसर ठरत असून गाव पातळीवर गाव बैठका घेत या बाबत जनजागृती करण्यात येत आहे...
रोहा तालुक्यात जातीचा दाखला प्रश्न आता चांगलाच पेटला आहे त्यावर जातपडताळणी साठी शासनाने लावलेले १९६७ पूर्वीचे निकष त्यामुळे समाजात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया मागास राहीलो आहोत त्यामुळे येथिल कुणबी युवक देखिल सदरच्या जनजागृतीला उत्सफूर्तपणे प्रतिसाद देत आहेत तर कोलाड कुणबी ग्रूप समाज विभागवार गाव बैठकीच्या माध्यमातून कोलाड विभाग अधक्ष संदेशजी लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वरसगाव येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान श्री सापया मंदिर सभाग्रहात सभा आयोजित करण्यात आली होती याला येथील ग्रामस्थांनी भरभरुन प्रतिसाद दिला...
देशात ३५० हून अधिक जातींचा ओबिसीत समावेश आहे त्यातील हि एक कुणबी जात आहे मात्र त्यावर जात पडताळणी साठी शासनाने लावलेले अटी शर्ती त्यामुळे आपले जात प्रमाणपत्र पडताळणी साठी पूर्वीच्या नोंदी असल्याचा प्राप्त होत नसल्याने ती जात पडताळणी होत नाही तर त्यापासून वंचित राहिलो आहोत त्यामुळे आता येथील कुणबी समाज बांधव एकटवला असून यासाठी शासनाने लावलेले १९६७ ची अटी शर्ती रद्द करण्यात याव्या यासाठी सारे हवेदावे बाजूला ठेवून समाजाच्या उन्नतीसाठी एकत्रित येण्यासाठी सर्वत्र निर्धार केला जात असल्याचे कोलाड, खांब,तसेच विविध रोहा तालुक्यातील विविध विभागात दिसून येत आहे...
यावेळी कोलाड कुणबी ग्रूप चे अध्यक्ष संदेश लोखंडे,संघटनेचे कार्यकारणी सदस्य तथा प्रमुख मार्गदर्शक राजेश कदम, गणेश निवाते, अजय कापसे सर, विजय पवार, मारुती मालुसरे, नरेश बिरगावले, मारुती बाईत, सचिन भिलारे, दिनेश धनवी, प्रसाद सानप, तसेच वरसगाव गावचे प्रतिष्ठित नागरिक एकनाथ बागुल, तुकाराम सानप, कापसे गुरुजी, अजित आंब्रुस्कर,रवी सानप आदी समाज बांधवांनी कुणबी समाज बांधव जातीच्या दाखल्या संदर्भामध्ये महत्त्वाच्या मागण्यांवर आणि मुद्द्यांवर सविस्तर माहिती देत कुणबी दाखल्या बाबतीमधील आपले गाऱ्हाणे समस्या सोडविण्यासाठीचे सर्वांनी अधिक एकत्रित तसेच संघटित होऊन प्रयत्न व उपाय योजना करण्याविषयी तालुका कमिटीकडे प्रत्येक विभागवार प्रस्ताव गेल्यास आपल्याला हमखास न्याय मिळेल असे आवाहन करण्यात आले...
तसेच याप्रसंगी वरसगाव गावचे ग्रामस्थ प्रतिष्ठित नागरिक एकनाथ बागुल, तुकाराम सानप, कापसे गुरुजी, अजित आंब्रुस्कर,रवी सानप, यांच्यासह उपस्थित कोलाड कुणबी कार्यकारणी कमितीचे स्वागत केले व आभार व्यक्त करत समाजाच्या विविध मागण्यासाठी एकत्रित येण्यासाठी आश्वशित केले...