रोहा - विशेष प्रतिनिधी
आढावा बैठक निव्वळ औपचारिकता !कामगार व कंपन्यांचे आरोग्य राम भरोसे,
रोहा धाटाव येथील आरआयएच्या सभागृहात औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कंपन्यांतील कामगार, कंपनी परिसराची सुरक्षा व आरोग्या बाबतच्या महत्त्वाच्या बैठकीला अनेक महत्वाच्या अधिकाऱ्यांनी पाठ फिरवली, रोह्याचे प्रांताधिकारी, कंपनी असोसिएशनचे अध्यक्ष, एमआयडीसीचे अभियंता, अनेक कंपन्यांचे अधिकारी आदींसह स्थानिक लोकप्रतिनिधी गैरहजर राहिले. परिणामी ही आढावा बैठक निव्वळ औपचारिकता म्हणून पार पडली. कंपनी आणि कामगारांच्या सुरक्षेबाबत प्रशासन आणि कंपन्यांचे अधिकारी गंभीर नाहीत हेच आजच्या या महत्त्वाच्या बैठकीतुन दिसून आले
महाड एमआयडीसीतील कंपनीच्या भयानक दुर्घटनेनंतर कारखाना सुरक्षा विभाग कामाला लागले आहे, त्यासाठी औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयातर्फे रासायनिक अपघात, आपत्कालीन योजना , तयारी व प्रतिसाद विषया अंतर्गत रासायनिक अपघात व्यवस्थापनासाठी स्थापन करण्यात आलेल्या रोहा माणगाव स्थानिय अरीष्ठ समूहाची कारखाना सुरक्षा उपाययोजनां बाबत आढावा घेण्यासाठी बैठक आज रोह्यात संपन्न झाली, या बैठकीला सुरक्षा व आरोग्य विभागले उपसंचालक सुनील ठाकरे, एमपीसीबीचे राजेश ऑटी, अप्पर तहसीलदार प्रकाश मेहत्रे, नायब तहसीलदार अमृता सुतार, काही कंपन्यांचे सुरक्षा अधिकारी उपस्थित होते.
औद्योगिक सुरक्षा विभागाचे उप संचालक सुनील ठाकरे यांनी उपस्थितांना अपघात व त्यावरील उपाययोजनांची माहिती दिली. बैठकीत सुरक्षा व आरोग्य बाबतचा आढावा घेण्याऐवजी प्रशिक्षण सादरीकरण करण्यात आले, उपस्थितांनी त्यावर आक्षेप नोंदविले. रासायनिक कारखान्यांचे वाढते अपघात, वारंवार दुर्घटना होऊनही एमपीसीबी, कारखाना निरीक्षक प्रशासन कधीच भानावर येत नाही. संबंधीत अधिकारी कंपन्यांना भेटी देऊन केवळ पाहुणचाराची औपचारिकता पूर्ण करून घेतात, कंपन्या दुर्घटनांत धाटाव एमआयडीसीही मागे नाही. मागील पाचचार वर्षात अनेक दुर्घटना घडल्या. वारंवार घडणाऱ्या दुर्घटनांकडे एमपीसीबी, कारखाना निरीक्षक विभाग गांभीर्याने पाहत नसल्याचे सामाजिक करकर्ते राजेंद्र जाधव यांनी या आढावा बैठकित स्पष्ट केले...
एमआयडीसी अभियंता, रोहा प्रांताधिकारी,आर आयएचे अध्यक्ष बैठकीला गैरहजर
कंपन्यातील सुरक्षा व सामाजिक आरोग्य विषयक महत्वाच्या आढावा बैठकीला खुद्द एमआयडीसीचे अभियंता गीते यांसह प्रशासनाचे महत्त्वाचे अधिकारी गैरहजर दिसल्याने कंपन्या आणि कामगारांच्या आरोग्य व सुरक्षेबाबत किती गांभीर्यता आहे हे बैठकीतून समोर आले. आढावा बैठकीला महत्त्वाचे अधिकारी उपस्थित न राहिल्याने मंगळवारची आढावा बैठक निव्वळ औपचारिकता ठरली...
प्रतिक्रिया ;-
आरोग्य व सुरक्षा विषयांवर एकत्रित काम करू, निकोप सुरक्षित वातावरणाची निर्मिती करू, यापुढे सुरक्षा व आरोग्य विषयांवर मासिक बैठक घेऊ, त्यातून निश्चित फरक दिसेल असे उपस्थितांना ठाकरे यांनी आश्वासित केले-सुनील ठाकरे ,उपसंचालक औद्योगिक सुरक्षा विभाग