रोहा/शहानवाज मुकादम
श्रीवर्धन नगर पालिकेचे सीईओ यांनी जनतेची मनापासुन केलेल्या सेवा...श्रीवर्धन शहरातील जनता विसरणार नाही...
श्रीवर्धन शहरातील नगर पालिकेचे सीईओ श्री विराज साहेब लवाडे यांनी जनतेसाठी केलेल्या मोलाच्या कामगिरीबद्दल मानव अधिकार मिशन अध्यक्ष रायगड जिल्हा यांनी दिले मनपूर्वक आभार पत्र...गेल्या काही महिन्यांपासून श्रीवर्धन शहरातील जनतेस उद्भवलेल्या अनेक समस्या आणि मानव अधिकार मिशनचे अध्यक्ष श्री रशाद करदमे यांनी उपस्थित केलेल्या अनेक समस्यांचे गांभीर्य लक्षात घेऊन वेळोवेळी सीईओ श्री विराज साहेब यांचे मोलाचे कार्य पार पाडले आहेत..
तसेच समुद्र किनारी लावलेले सीसीटीवी कॅमेरे आणि रस्ता दुरुस्ती असो किवा पाणी पुरवठ्याची समस्या असो, त्यानी स्वतःच नेहमी पाहणी करून जनतेच्या समस्या जाणून घेत त्वरित निवारण केले आहे...
तसेच भर पावसाळ्या मध्ये विहिरीत पडलेल्या मुक्याप्राण्यांचे जिव वाचविण्याकरीता त्यानी केलेले कार्य व जनतेची मनापासून केलेली सेवा कधीच श्रीवर्धन शहरातील जनता विसरणार नाही...
मानव अधिकार मिशन रायगड जिल्हा अध्यक्ष श्री रशाद करदमे यांनी श्रीवर्धन नगर पालिकेचे मुख्य कार्य कारी अधिकारी (श्री विराज साहेब लवाडे)साहेब यांनी श्रीवर्धन शहरातील केलेले सर्व बहुमूल्य कार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करीत आसेच नेहमीच श्रीवर्धन शहरातील जनतेला सहकार्य करावे आशी आशा बाळगत पत्र देऊन सन्मान करण्यात आला...