महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीच्या वतीने जिल्हास्तरीय गुरुगौरव पुरस्काराचे आयोजन.


 कोलाड ( श्याम लोखंडे) 

त्याग ,निष्ठा,सेवा हेे ब्रीदवाक्य असणारी लोकप्रिय शिक्षक संघटना म्हणजे "महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती"

त्याग ,निष्ठा आणि सेवा हेे ब्रीदवाक्य असणारी, विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी आणि शिक्षकांच्या न्यायासाठी लढणारी  राज्यातील लोकप्रिय शिक्षक संघटना म्हणजे "महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती"आहे...ही समिती नेहमीच शिक्षकांचे विविध प्रश्न त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी तालुका जिल्हा व शासन स्तरावर आदर्श शिक्षक समिती सातत्याने प्रामाणिकपणे प्रयत्न करत असते...तथा पाठपुरावा करत असते... त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात  शिक्षक हितासाठी लढणारी संघटना म्हणून आदर्श शिक्षक समितीची विशेष ओळख आहे...

या संघटनेच्या वतीने विविध उपक्रम वर्षभर घेतले जातात... त्यामध्ये गुरुगौरव पुरस्कार सोहळा, सरकारी कर्मचारी क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रम, रक्तदान शिबिर, नैसर्गिक आपत्तीसमयी सामाजिक जाणीव ठेवून  वस्तू व धान्य स्वरूपात सहकार्य, कोरोना काळात आरोग्य विषयक यंत्र साधने व औषधोपचार साहित्य वाटप , विद्यार्थी गुणगौरव सोहळा,यांसारखे कित्येक शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक सामाजिक व आरोग्य विषयक उपक्रम हाती घेऊन यशस्वीपणे राबविणारी संघटना म्हणजे आदर्श शिक्षक समिती होय...

या अनुषंगाने शनिवार दि.2 डिसेंबर 2023 रोजी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा- रायगड  यांच्या वतीने जिल्हास्तरीय गुरु गौरव पुरस्कार सोहळा 2023 आयोजित करण्यात आहे.या कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे जिल्ह्यात वाडी-वस्तीवर, तळागाळात काम करणाऱ्या शिक्षक बंधू भगिनींच्या कार्याची ओळख सबंध जिल्ह्याला व्हावी, त्यांच्या ज्ञानदानाच्या कार्याचा सन्मान व्हावा आणि त्यापासून अनेकांना स्फूर्ती मिळावी हा होय... त्यामुळे अशा शिक्षकांचा गौरव प्रमूख मान्यवरांच्या शुभहस्ते ज्येष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे ठिक दुपारी तीन वाजता या सोहळा निमित्ताने मानपत्र देऊन अशा गुरूजनांचा सत्कार सन्मान केला जाणार असल्याची माहिती जिल्हा अध्यक्ष आदर्श शिक्षक समिती रायगड तथा माजी शिक्षण व क्रीडा समितीचे सदस्य अजय कापसे यांनी दिली आहे...

सोहळ्यासाठी सबंध जिल्हा भरातून मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित राहणार आहे...

शिक्षकांच्या कार्याची योग्य दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्याचा स्तुत्य उपक्रम हाती घेतल्याबद्दल सर्व स्तरातून महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समिती शाखा रायगड चे  कौतुक असल्याचे सांगत सर्व शिक्षक बांधवानी या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अजय कापसे यांनी केले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post