महाराष्ट्र वेदभुमी

कामगार नेत्या श्रुती म्हात्रे यांचा वाढदिवस उत्साहात साजरा.


उरण दि २९(विठ्ठल ममताबादे)

कामगार क्षेत्रातील रायगडच्या डॅशिंग कामगार नेत्या श्रुती शाम म्हात्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन गणेश मंदीर येथे अभिषेक करून गणेशाचे दर्शन घेत वाढदिवसाची सुरूवात करण्यात आली... दि. २८ रोजी पनवेल खांदा कॉलनी आगरी शिक्षण संस्थेत वाढदिवस मोठ्या उत्साहात पार पडला...



यावेळी कोकण श्रमिक संघाचे रायगड जिल्ह्यातील वेगवेगळ्या युनिटचे पदाधिकारी तसेच पनवेल येथील राजकीय, सामाजिक संघटनाचे पदाधिकारी आणि नातेवाईकांनी प्रत्यक्ष भेटुन तसेच मोबाईलद्वारे भरभरून शुभेच्छारूपी आशिर्वाद दिला. याप्रसंगी आगरी शिक्षण संस्थेचे संचालक के. बी. घरत, कोकण श्रमिक संघाच्या वतीने एकनाथ ठोंबरे, आगरी शिक्षण संस्थेतील शिक्षक व कर्मचारी वृंद, पनवेल शहर अध्यक्ष सुदाम पाटील, कार्याध्यक्ष अभिजित पाटील, माजी उपसभापती वसंत काटावले , रायगड जिल्हा मराठा संघाचे अध्यक्ष उत्तमशेठ भोईर, तसेच काँग्रेसचे जेष्ठ नेते श्री मुंढे, काँग्रेस नेते प्रविणदादा मधुकरशेठ पाटील, दै. पुढारीचे जाहिरात प्रमुख अभय पाटील, माथेरान युनिटचे दिनेश सुतार तसेच कर्मचारी, बी. एम. टी. सी. संघटनेचे सचिव सदानंद भोपी, सदस्य के. एस. घरत यांनी प्रत्यक्ष भेटुन शुभच्छा दिल्या.सायंकाळी गणेश मंदीरात श्रुती म्हात्रे यांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी व्यावसायीक सहकारी विक्रेता संघाचे अरूण कोळी, शिरिष लाड, संजय ननावरे, अभय पाटील यांच्या हस्ते श्रुती म्हात्रे यांचा स्त्कार करून व त्यानंतर केक कापून वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी विषेश करून तरूण वर्गाचा तसेच वयोवृद्ध जाणकार सामाजिक कार्यकर्ते, तसेच रायगड मधील कामगार वर्गाचा मोठ्या प्रमाणात उत्साही शुभेच्छांचा वर्षाव पाहायला मिळाला...

Post a Comment

Previous Post Next Post