कोलाड (श्याम लोखंडे)
रोहा तालुक्यात कुणबी दाखला प्रश्न आता चांगलाच पेटला आहे त्यामुळे सर्वसामान्य कुणबी समाज बांधवांना जातीचा दाखला पडताळणीसाठी शासनाचे वेगवेगळे निर्बंध लादण्यात आले आहेत त्यामुळे रायगड जिल्ह्यातील मुख्यतः रोहा, सुधागड, मुरुड, अलिबाग, खालापूर, कर्जत, पनवेल, येथील कुणबी समाजात जात पडताळणी होत नसल्याने तसेच प्रमाणपत्रासाठी होत असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया मागास, प्रवर्गातील आपल्या समाज आरक्षणापासून वंचित राहिले आहे त्यामुळे आता येथील कुणबी दाखल्यासाठी तालुक्यातील कुणबी समाज नेतेगण समाजाला योग्य दिशा देण्यासाठी तसेच न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला आहे...
कुणबी समाजावर लादलेले १९६७ या निकषानुसार पडताळणी साठी दाखला प्रक्रिया न थांबवता इतरही पुरावे तपासणे शासनाने गरजेचे आहे .तसेच पोलीस पाटील दाखला, समाजाचा दाखला, हवे ही माहिती घ्यावी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे या अनुषंगाने रोहा कुणबी समाजाची आढावा बैठक २७ नोव्हेंबर रोजी समाजाचे जेष्ठ विचारवंत नेतेगण, युवक पदाधिकारी यांच्या समावेत शासकिय विश्रामगृह रोहा येथे संपन्न झाली तसेच रविवार २६ नोव्हेंबर रोजी तालुका युवकांची झालेल्या सभे संदर्भात सभा झाली त्या सभेचा संपूर्ण आढावा तालुका अध्यक्ष अनंता थिटे यांनी जेष्ठ समाज नेतेगण पदाधिकारी यांना दिला...
तसेच कुणबी दाखला मिळावा या करिता पूर्वी केलेले प्रयत्न , सध्याची आजची चालु परस्थिती व पुढील सादरचा न्याय मिळाला पाहिजे म्हणून आंदोलनाची दिशा व त्याबाबत नियोजन या विषयी चर्चा झाली... तर आंदोलनाबाबत नियोजन करीता तसेच यासाठी १ डिसेंबर रोजी सभा आयोजित करण्याचे ठरले आहे... तसेच मोठ्या संख्येने युवकांनी उपस्थित लाभणार आहे यासाठी सर्व विभागीय युवक मंडळ यांना आव्हान करण्यात आले असल्याचे सांगत आंदोलनावर युवक ठाम राहिले आहेत त्यामुळे अधिक आक्रमक भूमिका घेतली तर न्याय मिळू शकेल असे सांगितले.तसेच अध्यक्ष श्री शिवरामजी शिंदे साहेब यांनी केले...
कुणबी समाजोन्नती संघ मुंबई ग्रामीण शाखा रोहा सदर आयोजित केलेल्या आढावा बैठकीस कुणबी समाज नेते तथा रायगड जिल्हा ओबीसी समन्वयक सुरेशजी मगर , रोहा तालुका कुणबी समाज अध्यक्ष शिवरामजी शिंदे,शंकरराव भगत,रामभाऊ सकपाळ, दत्ताराम झोलगे,युवक अध्यक्ष अनंत थिटे, यांनी मार्गदर्शन केले.यावेळी कुणबी समाज पदाधिकारी तसेच युवक पदाधिकारी उपस्थित होते...
कुणबी दाखला आता रोहा तालुक्यात चांगलाच पेटला आहे त्यामुळे सर्वत्र गाव पातळीवर देखील बैठकांवर बैठका घेतल्या जात असून यासाठी कुणबी युवक मंडळांनी यासाठी आक्रमक भूमिका घेत वेळ पडल्यास आंदोलन छेडणार असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे कुणबी दाखल्यासाठी अथवा त्यावर असलेली शासनाची १९६७ अट रद्द करण्यासाठी येथील कुणबी समाज नेमकी काय भूमिका घेणार हे पाहावे लागणार आहे...क