महाराष्ट्र वेदभुमी

शिवक्रांती संस्थेच्या गडकिल्ले बांधणी स्पर्धेचे पारितोषिक वितरण समारंभ संपन्न.


कर्जत(प्रतिनिधी )

तालुक्यातील मुलांनी दिवाळी सणात गड किल्ले बांधणी करून छ शिवाजी महाराजांच्या विचारांचा जपला वारसा , 

दिपावली सणाचे औचित्य साधून सालाबादप्रमाणे शिवक्रांती सामाजिक संस्था महाराष्ट्र राज्य, कर्जत तालुका यांच्या वतीने तालुका स्तरीय गडकिल्ले बांधणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती... या स्पर्धेत तालुक्यातील २० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता... तालुक्यातील वेगवेगळ्या भागातील मुलांनी दिवाळी सणात गड किल्ले बांधणी करून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा वारसा , किल्ल्यांप्रती असलेले  प्रेम आपल्या कलेच्या माध्यमातून गडकिल्ले बांधणी प्रतिकृती साकारून इतिहास जिवंत ठेवण्याचे काम या लहान मुलांनी केले... 

गडकिल्ले बांधणी स्पर्धेत विजयी 

जय हनुमान ग्रुप पोशिर यांनी मल्हार गड - प्रथम क्रमांक , 

पार्थ हरेश सोनावले (नेरळ) या स्पर्धकांनी पन्हाळ गड साकारून द्वितीय क्रमांक  

ओमकार मित्रमंडळ दहिवलीचा राजा यांनी पद्मदुर्ग  किल्ला साकारून तृतीय क्रमांक 

रमेश झुगरे (पाली) यांनी राजगड गड साकारून उत्तेजनार्थ पारितोषिक 

विजेत्यांना रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि शिवचरित्र  देवून गौरविण्यात आले पारितोषिक विजेत्यांना त्यांच्या घरी जाऊन देण्यात आले... स्पर्धा समन्वयक म्हणून आशिष जोशी  यांनी जबाबदारी पार पाडली तर स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विवेक भोपी, तालुका अध्यक्ष अविनाश भोईर यांच्या मार्गदर्शनाखाली  कर्जत विभागाच्या वतीने पार पाडण्यात आली... बक्षीस वितरण  प्रसंगी तालुका अध्यक्ष युवा व्याख्याते अविनाश भोईर, तालुका उपाध्यक्ष रोहन लोभी, संघटक भास्कर डोईफोडे, सदस्य मुकुल दळवी, आकाश विरले, रोहित तुपे, आशिष जोशी आदी पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post