महाराष्ट्र वेदभुमी

दिवा भाजपच्या मा.महिला अध्यक्षा ज्योती पाटील व मनसेच्या महिला विभाग अध्यक्षा मयुरी तेजस पोरजी यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश


माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शेकडो महिलांसह प्रवेश

दिवा:-तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना पक्षाने पदावरून डावल्यानंतर त्यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली.तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाला प्रभावित होऊन मयुरी पोरजी व तेजस पोरजी यांनी आज पक्ष प्रवेश केला...

शनिवारी दुपारी ज्योती पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते राजन विचारे,लोकसभा संपर्कप्रमुख गुरुनाथ खोत,ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे,कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत ज्योती पाटील व मयुरी पोरजी तेजस पोरजी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली.

यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे

दिवा शहर पदाधिकारी 

सचिन पाटील शहर प्रमुख 

रोहिदास मुंडे शहर संघटक

अभिषेक ठाकूर युवा शहर अधिकारी

वैष्णव पाटील उपशहर प्रमुख

योगिता नाईक उपशहर संघटिक

प्रियंका सावंत उप शहर संघटिका

गुरुनाथ नाईक विभाग प्रमुख

नवनीत पाटील समाजसेवक 

चेतन पाटील विभाग प्रमुख

मच्छिंद्रनाथ लाड विभाग प्रमुख

हेमंत नाईक समाजसेवक

स्मिता जाधव विभाग संघटीका नागेश पवार,प्रशांत आंबोणकर,विकास इंगळे,योगेश निकम,संजय जाधव,अनिकेत सावंत,दिवा शहरातील इतर सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी युवा उपशहर प्रमुख उपविभाग प्रमुख शाखाप्रमुख उपशाखाप्रमुख गटप्रमुख व तमाम शिवसैनिक उपस्थित होते...

ज्योती पाटील व मयुरी पोरजी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.दिवा शहरात पक्ष फुटी नंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ज्योती पाटील मयुरी पोरजी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने  कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे...दरम्यान अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला राम राम ठोकल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात आहे...

Post a Comment

Previous Post Next Post