कोलाड (श्याम लोखंडे)
जन्माने आणि कर्माने मुलतःकुणबी असणारा रायगड जिल्ह्यात कुणबी समाज बांधव मात्र तोच शासनाच्या सामाजिक, शैक्षणिक,नोकर भरती,व्यवसायापासून वंचित त्यामुळे त्यांच्यावर जात पडताळणी साठी शासनाने लावलेले निकष यावर आता कुणबी बांधव चांगलाच पेटून उठला आहे.... त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आम्हीं मागे हटणार नाही वेळ पडल्यास आंदोलन छेडणार अशा आक्रमक पवित्रा रोहा तालुक्यातील कुणबी युवक बांधवानी घेतला असल्याचे समोर आल्याचे दिसून येत आहे...
रोहा तालुका कुणबी युवक मंडळाची सभा आज रविवारी २६ नोव्हेंबर रोजी माजी आमदार स्व.पा.रा.सानप कुणबी भवन रोहा येथे तालुका युवक अध्यक्ष अनंत थिटे यांच्या अध्यक्षतेखाली मोठ्या उत्साहात संपन्न झाली यावेळी राज्यात सध्या मराठा समाजाला आरक्षण मिळावे न्याय मिळावा म्हणून आंदोलनातून जागो जागी पेटून उठला आहे तसेच ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता शासनाने त्यांना आरक्षण द्यावें यावर ओबीसी समाज तथा नेतेगन ठाम राहिले आहेत त्यामुळे ओबीसीला धक्का न लावता मराठयांना आरक्षण देण्यास कोणतीही हरकत नाही तसेच राज्य सरकारने जाहीर केलेल्या मराठा कुणबी,कुणबी मराठा ह्या नोंदींचा डेटा गोळा केला जात आहे परंतु सदर शासनाला मिळत असलेल्या देट्यापासून कोकणातील मुख्यतः रायगड जिल्ह्यातील उत्तर रायगड हा कुणबी नोंदी पासून वंचित राहिला आहे या अनुषंगाने तालुका कुणबी युवकांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती याला शेकडोहून अधिक कुणबी युवकांनी उपस्थीत दर्शवित जात प्रमापत्रासाठी वेळ पडल्यास आंदोलन छेडणार अशा भूमिकेत सर्वांनी ठाम मत व्यक्त केले...
त्यामुळे आता कुणबी समाज ही आक्रमत्तेच्या तयारीत असल्याचे रोहा तालुक्यात दिसत असून यासाठी तालुका स्तरावर कुणबी युवक मंडळाच्या वतीने दाखला प्रश्नांवर वेगळी समिती तालुका अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली नेमण्यात आली असून यासाठी समाजाच्या उन्नतीसाठी आपले सारे राजकीय हेवेदावे तूर्तास बाजूला ठेवून केवळ शासनाने जातीचा जात पडताळणी करण्यासाठी लावलेले जाचक नियम आणि अटी त्यावर लादलेले निकष यामुळे समाज सामाजिक,शैक्षणिक, नोकर भरती, व्यवसायात अर्थिक दृष्टया मागास राहीलो आहोत त्यामुळे आता न्याय मिळेपर्यंत आम्हीं मागे हटणार नाही वेळ पडल्यास आंदोलन छेडणार अशा भूमिकेत रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधव यांनी आयोजीत सभेत सर्वानुमते ठराव करण्यात आला आहे...
कुणबी दाखल्यांच्या मुद्द्यावर कुणबी युवक मंडळ रोहा कायदेशीर मार्ग अवलबंणार आहे...
एकिकडे मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याची प्रक्रिया विचाराधीन असताना आता "आम्ही जन्माने व कर्माने कुणबी असताना देखील केवळ आमच्याकडे १९६७ पूर्वीचे पुरावे नसल्यामुळे आम्ही दाखल्यांपासून वंचित आहोत.हा आमच्यावर अन्याय आहे. ही बाब अन्यायकारक असून त्याला उच्च न्यायालयात आव्हान देणे गरजेचे असल्यामुळे आता १९६७ पुर्वीच्या पुराव्या विरोधात कुणबी दाखल्यापासून वंचित राहिले आहे त्यामुळे उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा निर्णय झाला आहे.सहाजिकच याचा मराठा आंदोलन व ओबीसी आंदोलनावर दूरगामी परिणाम होणार आहे त्यामुळे कुणबी दाखल्यासाठी आता रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधव आता चांगलेच आक्रमक झाले असल्यामुळें सविधांच्या व शांततेच्या मार्गाने येत्या दोन तीन दिवसात संबधीत तहसीदार,प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असून आक्रमक आंदोलनाची दिशा पुढे ठरविण्यात येणार असल्याचे ठरविण्यात आले...
सदर आयोजित करण्यात आलेल्या सभेत यावेळी अध्यक्ष अनंत थिटे,महेश बामुगडे,राजेश कदम, संजय मांडलुस्कर, संजय सानप, अजय कापसे, अरुण अगले,अमित मोहिते,रवी शिंदे, शशिकांत कडू, संदेश लोखंडे, डॉ श्याम भाऊ लोखंडे, सुहास खरिवले आदींनी मनोगत व्यक्त करतांना सांगितलें की कुणबी समाजावर लादलेले १९६७ या निकषानुसार पडताळणी साठी दाखला प्रक्रिया न थांबवता इतरही पुरावे तपासणे शासनाने गरजेचे आहे .तसेच पोलीस पाटील दाखला, समाजाचा दाखला, हवे ही माहिती घ्यावी आणि जात पडताळणी प्रमाणपत्र देण्यात यावे...
प्रसंगी सभेच्या सुरुवातीला मुंबई येथे २६ /११ च्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या शुर विर जवानांना आदरांजली अर्पण करून तसेच आजचा सविंधान दिवस म्हणून तसेच कुणबी समाज नेत्यांना अभिवादन करून सभेची सुरूवात करण्यात आली... सभेचे सूत्रसंचालन सचिव मंगेश देवकर यांनी केले तर आभार प्रदर्शन रवी शिंदे यांनी केले...