महाराष्ट्र वेदभुमी

एका मागोमाग एक काळाचा घात आयुष्यभर काबाडकष्ट करणारे घोसाळकर परिवार,


चणेरा विशेष प्रतिनिधी

काही दिवसापूर्वी रोहा येथे झालेल्या  सिलेंडरचा स्फोट  होऊन ३ इसम गंभीररित्या  जखमी झाल्या होत्या त्यामधील एक तरुणीचा  उपचारा दरम्यान मृत्यु  झाला  तर मनोहर  घोसाळकर हे मृत्यूशी  झुंज  देत होते त्यांचा शेवटी आज  पहाटेच्या  सुमारास प्राणज्योत मावळली...

वरसे भुवनेश्वर कालवा रोड येथे १३ नोव्हेंबर रोजी सिलेंडर स्फोटाच्या दुर्घटनेतील ३ इसम गंभीरतेने जखमी झाले होते... जखमी तरुणी भावना मनोहर घोसाळकर वय २४ हिचा दिनांक १८ नोव्हेंबर रोजी उपचारा दरम्यान मृत्यू झाला... तर आज पहाटेच्या वेळी तिचे वडील मनोहर घोसाळकर यांचा सुद्धा उपचारा दरम्यान मुंबई येथे हॉस्पिटलमध्ये निधन झाले... ही बातमी समजताच भुवनेश्वर ग्रामस्थांवर दु:खाचे डोंगर कोसळले...

Post a Comment

Previous Post Next Post