महाराष्ट्र वेदभुमी

गॅस सिलेंडरचा स्पोट तीनजण गंभीर जखमी जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविले.

रोहा विशेष (प्रतिनिधी)

मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात घरेलु सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना

रोहा तालुक्यात वरसे ग्रामपंचायत हद्दीतील कालवा रस्ता भुवनेश्वर येथील रहिवासी मनोहर अंबाजी घोसाळकर यांच्या घरात घरेलु सिलेंडरचा स्फोट झाल्याची खळबळजनक घटना सोमवारी घडली... सिलेंडरच्या स्फोटात मनोहर घोसाळकर यांसह अन्य दोघेजण सदरच्या घटनेत जखमी झाल्याचे समोर आले आहे... दरम्यान, सिलेंडर स्फोटाची माहिती समजताच अग्निशमन दल व पोलीस घटनास्थळी दाखल झाले...यातील जखमींना अधिक उपचारासाठी मुंबईला हलविण्यात आल्याची माहिती रोहा पोलिसांनी दिली...

कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी घरातील साहित्याची मोठ्या प्रमाणात नुकसान 

तालुक्यातील भुवनेश्वर कालवा रस्ता येथील रहिवासी मनोहर घोसाळकर यांच्या घरात ऐन दिवाळीत सिलेंडरचा स्फोट झाल्याचे समोर आले. सिलेंडरच्या स्फोटाच्या दुर्घटनेत मनोहर घोसाळकर, सायली घोसाळकर, भावना घोसाळकर असे एकाच कुटुंबातील तिघेजण गंभीर जखमी झाले, घर, घरातील साहित्याचीही मोठ्या प्रमाणात नुकसान झाली. स्फोटानंतर शेजारी व नागरिकांनी वेळीच सतर्कता दाखवत आग आटोक्यात आणल्याने मोठा अनर्थ टळला, हे प्रथमदर्शी समोर आले. घटनेचा अधिक तपास रोहा पोलीस करत आहेत. दरम्यान, ऐन दिवाळी सणात दुर्दैवी घटना घडल्याने घोसाळकर कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले आहे,



घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे -परीट समाजाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रविंद्र कान्हेकर 

तसेच घोसाळकर कुटुंबियांवर ऐन दिवाळीत आलेल्या संकटाला दानशूर लोकांनी घोसाळकर कुटुंबाला सहकार्य करावे असे आवाहन परीट समाजाचे रायगड जिल्हा युवा अध्यक्ष रविंद्र कान्हेकर यांनी केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post