महाराष्ट्र वेदभुमी

दिव्यांनी गड उजलून निघाला,दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेची सुरगडावर दिवाळी पहाट

 


कोलाड (श्याम लोखंडे) 

पारंपरिक पोशाख परिधान करून साजरी केली दिवाळी पहाट.

दिवाळीच्या पहिल्या दिवशी रायगड रोहा तालुक्यातील ऐतिहासिक असलेल्या खांब परिसरातील सुरगडावर दुर्गवीर प्रतिष्ठान आणि संस्थेचे सभासद किशोर सावरकर आणि महेंद्र पारठे यांच्या वतीने गडावर दीपोत्सव दिवाळी पाहाट या कार्यक्रमाचे आयोजन केले होते याला येथिल सर्व संस्थेच्या शिलेदारांनी तसेच दुर्घगड प्रेमींनी उस्पूर्त प्रतिसाद दिला...


शिव शाहीर रामजी दादा कदम शिवव्याख्यान वैजनाथ खांब येथील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात आयोजित 

दिवाळी पहाटेच्या पूर्वसंदेला ११ नोव्हेंबर २०२३ रोजी रात्रौ ९ : ३० वाजता शिवव्याख्यात लेखक, कवी, तसेच शिव शाहीर रामजी दादा कदम मानगड माणगाव यांचे शिवव्याख्यान वैजनाथ खांब येथील विठ्ठल रखुमाई मंदिर सभागृहात आयोजित करण्यात आले होते...तसेच सामाजिक संस्थांच्या वतीने गडावर ‘दिवाळी पहाट’ कार्यक्रमाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते... पहाटे सर्व गड परिसर दुर्गवीर प्रतिष्ठान आणि शिवप्रेमी नी भरून गेले होते...यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमास वैजेनाथ गावचे पोलिस पाटील मनोज सावरकर, उपसरपंच दत्ताराम वातेरे, ग्रामस्थ काशिनाथ वातेरे, जानू वातेरे, प्रसाद गोडबोले, तुषार गोडबोले, मारूती सावरकर, रोहिदास जाधव, केशव थिटे, राकेश महाबले, नामदेव वातेरे, गणेश महाबले नरेंद्र पारठे आदी ग्रामस्थ उपस्थित होते...


दुर्गवीर प्रतिष्ठान मावळे यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम केला गडावर साजरा 

गेली दहा ते बारा वर्ष दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे शिलेदार सुरगडावर संवर्धन करत आहेत.. संवर्धनाच्या माध्यमातुन गडाला गड पण आणण्यासाठी काम केले आहे... यासाठी दिवाळीचा दिवा आपल्या सुरगड गडावर लावला पाहिजे या हेतूने सर्वांनी दिवाळी पहाटेच्या पूर्वसंदेचा वैजेनाथ येथील कार्यक्रम आटपून रात्रौ १वाजता काही ग्रामस्थ आणि दुर्गवीर प्रतिष्ठान संस्थेचे शिलेदार गडावर जाण्यासाठी पारंपारिक पद्धतीने मशाल पेटवून मार्गस्थ झाले प्रथम त्यांनी गडाची माता अंन्साई देवी मंदिर गाभारा स्वच्छ करून तीचं मनोभावे पुजन केले मंदिरा सभोवती दिवे लावले मशाल लावली मनोभावे पूजा आणि आरती करून सुरगडावर पारंपारिक पद्धतीने शिवकालीन ऐतिहासिक वेशभूषा परिधान करून गडावर झेंडूच्या फुलांची तोरणं बांधून घेतले नंतर गडावर विराजमान असलेले श्री हनुमंत राय यांचे पुजन करून आरती केली, तदनंतर शिवमंदिर पुजन करून गड परिसरात दिवे लावले सगळीकडे दिव्यांच्या प्रकाशाने गड उजळून निघाला आणि प्रसन्नता शांतता आनंददायी वातावरणात निर्माण झाले होते...अशाप्रकारे दुर्गवीर प्रतिष्ठान मावले यांनी दिवाळी पहाट हा कार्यक्रम गडावर साजरा केला...

पहिला दिवा गडाला नंतर माझ्या घरला या संकल्पनेचे जोरावर दिवाळी पहाट साजरी केली

यासाठी दुर्गवीर प्रतिष्ठानचे सभासद एकनाथ अस्वले, निलेश वाघमारे, ऋषी दळवी,रुतिक सोंडकर ,आदित्य कदम ,प्रदिप सिरसाठ, हितेश बंड,सागर पाटील,प्रतिक पाटेकर,सुमित पाटील,गोरक्ष तळसकर,सुरज गोरिवले, रमेश विठ्ठल राणे,आदी मुंबईहून आलेले शिलेदार दुर्गगड प्रेमी तसेच माणगाव तालुक्यातील डोंगरी गावातील प्रमोद डोंगरे,विठ्ठल केंबळे ,आणि मानगड येथील शिवव्याख्याते लेखक रामजी दादा कदम या सर्व दुर्गवीरांनी तसेच खांब वैजेनाथ येथील शिवप्रेमी यांनी सुरगडावरील दिवाळी पहाट कार्यक्रम छत्रपती शिवरायांच्या या ऐतिहासिक गडावर मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने भक्तिभावाने साजरा करत द्विगुणित आनंद साजरा केला.

Post a Comment

Previous Post Next Post