महाराष्ट्र वेदभुमी

स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ-कोलाड यांच्या वतीने देव दर्शन वारीचे आयोजन



कोलाड (श्याम लोखंडे)

देव दर्शन वारी.प्रति पंढरपूर,शिर्डी, बाळाजी, गगनगिरी महाराज मठ,सातारकर महाराज मठ,व इतर देवस्थान

रायगड रोहा तालुक्यातील स्नेह जेष्ठ नागरिक कल्याणकारी मंडळ कोलाड यांच्या वतीने सलाहाबाद प्रमाणे याही वर्षी आपल्या ज्येष्ठ नागरिक संघटनेनी  देव दर्शन वारीचे आयोजन केले आहे...

सहलीचे ठिकाण:- प्रति पंढरपूर,प्रति शिर्डी,प्रति बाळाजी, गगनगिरी महाराज मठ,सातारकर महाराज मठ,व इतर देवस्थान ठिकाणी कमप्राप्त दर्शनासाठी वारीचे आयोजन करण्यात आले असून सहल दि.२९ नोव्हेंबर २०२३ रोजी एक दिवसाची असून,सकाळी ६.३० वा.कोलाड सरकारी दवाखाना येथून निघणार असून वरील स्थळांचे देव दर्शन घेऊन पुन्हा माघारी येणार असून यासाठी कोलाड विभागातील ज्येष्ठ नागरिकांनी यासाठी आपली नावांची नोंद लवकरात लवकर करावी असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे...

यासाठी सहल प्रवास भाडे नास्टा चहा यासाठी रोख ६०० रू.असे ठरले आहे.वरील रक्कम लवकरात लवकर म्हणजेच दि.१५ नोव्हेंबर पर्यंत श्री.प्रविण भाई गांधी,अशोक कदम,दगडू बामुगडे,तसेच बळीराम ठोंबरे यांजकडे जमा करणेचे आहेत...

सोबत स्वतः साठी एका वेळेचे जेवण,पाणी,व आपणास आवश्य  असणारी औषधे सोबत घेणे...तसेच देव दर्शन वारीचे ठिकाण व आयोजित सहल व्यवस्थित व उत्तमरित्या व व्यवस्थित पारपडणेसाठी सहकार्य करावे असे आवाहन शेवटी ज्येष्ठ नागरिक संघटना कोलाड यांच्या वतीने करण्यात आले आहे..

Post a Comment

Previous Post Next Post