उरण दि १३(विठ्ठल ममताबादे )
लेख स्पर्धेमध्ये जासई विद्यालयाची विद्यार्थिनी कु मानसी पाटीलचा तिसरा क्रमांक
नवी मुंबई पुनर्वसन विकास समितीमार्फत दि.बा. पाटील स्मृतीप्रित्यर्थ घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये लेख स्पर्धेमध्ये श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल व लोकनेते दि.बा. पाटील ज्युनिअर कॉलेज दहागाव विभाग जासई विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी मानसी पाटील हीचा तिसरा क्रमांक आलेला आहे...तीला प्रमाणपत्र, ट्रॉफी व बक्षिसाची रोख रक्कम अकरा हजार रुपये प्रदान करण्यात आले...यावेळी शाळा व्यवस्थापन विकास समितीचे अध्यक्ष कामगार नेते भारतीय मजदूर महासंघाचे राष्ट्रीय महामंत्री सुरेश पाटील, विद्यालयाचे प्राचार्य अरुण घाग,रयत सेवक संघाचे महाराष्ट्र राज्याचे समन्वयक नुरा शेख, लेखनिक ठाकूर सर, मुंगाजी मॅडम आणि विद्यार्थी उपस्थित होते...
