खांब - कोलाड (श्याम लोखंडे / नंदकुमार कळमकर ) :
इतिहासात रायगड हे भाताचे कोठार म्हणून प्रसिद्ध समजले जात आहे परंतु अचानक अवकाळी कोसळणाऱ्या पावसाने अखेर रागडातील शेतकऱ्यांच्या पिकांचा घात केला तर मुसळधार पावसासारखे रुद्ररूप धारण केले बुधवारी दुपारनंतर अचानक दणका दिला व भयानक झालेल्या पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे तर बाजारपेठेत दिवाळीसाठी खरेदीसाठी आलेल्या मंडळींची मोठी धावा धाव व पळापळ तर व्यवसायिकांची तर मोठी विक्रीसाठी मांडलेले समान गोळा करण्यासाठी मोठी धांदल उडाली अवकाळी पाऊस हा अचानक मुसळधार झाल्याने बळीराजाची गेली वर्षभराची संपूर्ण मेहनत वाया जाण्याच्या मार्गावर तर शेतात आलेली मोत्यासारखी कणसे व खरीपाचे पीक पावसाच्या धुमाकुलमुळे चिखलात गरदले आहे तर बळीराजाचे पीक तर गेलेच परंतु गुरांच्या वैरणीचा प्रश्न हा अनेक शेतकऱ्यांचा चिंतेचा विषय बनला आहे ऐन दिवाळीच्या तोंडावर धो धो कोसळणाऱ्या पावसाने रोहा तालुक्यातील कोलाड ,खांब, देवकान्हे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून पहाटे धुक्का,दुपारी मोठी उन्हाची झळाळी तर
बुधवार दि.८ नोव्हेंबर रोजी दुपारी अडीचच्या सुमारास तालुक्यातील या भागात बळिराजा भात कापणी मळणीच्या कामात व्यस्त असतानाच अचानक वादळी वारे, गडगडाटासह लखलखती विज आणि आकाशात काळ्या ढगांची एकच गर्दी झाली. आणि पावणेतीनच्या सुमारास जणू दिवाळीचे बार वाजवत रिप रिप ठिबकत या आवेली पाहुण्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या भात पिकांचे मोठे नुकसान झाले असून नुकसान भरपाई ची मागणी केली जात आहे..
बुधवारी संपूर्ण वातावरण क्षणार्धात बदलले, सर्वत्र मातीचा सुगंध, मृदगंध दरवळला. ऐन दिवाळीच्या तोंडावर पडलेला हा पाऊस बळीराजाच्या शेतात पिकुन कापणी केलेल्या सोन्यासारख्या भातपिकाला नुकसानकारक असुन बळीराजाची मात्र एकच धावपळ उडाली आहे.सकाळपासुनच उष्मा, ढगाळ वातावरण आणि उन सावलीचा खेळ सुरु होता. पण इतक्या वेगाने आकाश दाटून येईल असे मात्र दिसत नव्हते. या भागातील विज पूरवठा दुपारच्या सुमारास देखील खंडीत झाले होते तर आता जवळपास पावसाची सर्वच नक्षत्र संपली आणि पाऊस पडला...
या अवकाळी गडगडत पडणाऱ्या पावसाने सर्व ॠतुचक्रच बदलले असल्याचे बोलले जात असुन पाऊस कधीही आणि कुठेही पडु शकतो याचा मात्र भरोसा उरला नसल्याचे बोलले जात आहे...
अचानक होत असलेल्या पावसाने रोहा तालुक्यासह जिल्ह्यातील भात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे दिसून येत आहे. बळीराजाचे खरीपाचे पीक परतीच्या पावसाने अखेर शेवटच्याक्षणी मातीत लोदवले शेतात आलेले मोत्यासारखे पीक पाहून पडत असणाऱ्या पावसाच्या चिंतेने शेतकरी बळीराज्याचे डोळे अक्षरशः अश्रूमय होत आहेत तर दुपारनंतर विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाट करत दररोज पडत असलेला पाऊस आणि शेकडोंच्या हेक्टरीत येथील बळीराजाने केलेली खरिपाच्या हंगामात केलेली भात लागवड केलेल्या पिकांचे बुधवारी दुपारी झालेल्या पावसात मोठे नुकसान झाले तर भातपिकांतून तयार होत असलेल्या गुरांच्या वैरणीचा पेंढा याची देखील आता संपूर्ण भात चिखलात गाडले गेल्याने धाना सह याचा मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून बळीराजाची चिंता वाढली आहे...
यावर्षी शेतात जोरदारपणे आणि भरभराटीचे आलेले मोत्यासारखे भातपीकांची कणसे डोलाने डोलू लागली आठ ते दहा दिवसांपासुन बळीराजाने भात कापणी मळणी ला सुरुवात केली त्यात काहींची कापणी तर काहींची झोडनी मळणी युद्ध पातळीवर सुरु असतानाच बुधवारी दुपारी पावसाने तडाखा देत पाऊस पडायला सुरुवात केल्यामुळे हातातोंडाशी आलेली मोत्यासारखी कणसे अक्षरशः जमीदस्त झाली असून पिकांचं शंभर टक्के नुकसान होत आहे. त्यातच दिवाळीचा सण सुरू झाला आहे...
शेतात पिकांचं नुकसान पाहून बळीराजाचे डोळे अश्रूमय होत आहेत. सोन्यासारखा पिंक वाया जात असल्याने त्यातच गुरांचा वैरण साठा याची मोठी चिंता बळीराजाला पडली आहे. त्यात यावर्षी काही शेतकऱ्यांनी भात पिकासह तीळ, नाचणी, वरीची व हळदीच्या पिकांची लागवड केली ते पीक देखील चांगल्या प्रकारे आली होती. काही विभागात ती देखील पिकं कापणीस योग्य झालेली आहेत मात्र अचानक आवेली आळेल्या पाऊस कोसळत असल्याने त्या पिकांचे देखील मोट्या प्रमाणावर नुकसान होत आहे..
प्रतिक्रिया
रोहा तालुक्यात बुधवारी दुपारनंतर आवेली झालेल्या पावसामुळे भात पिकांसह शेतकऱ्यांच्या विविध पिकांचे नुकसान झाले आहे दिवसंदिवस भरमसाठ होत असलेले महागाई त्यातच न परवडणारे बी बियाणे व रासायनिक खत तरी देखील शेतकरी हा काबाडकष्ट करून शेतात विविध पिकांची लागवड करून तो संपूर्ण जगाला अन्न धान्य पुरवठा करतो मात्र आज त्याच्यावरच उपासमारीची वेळ आली आहे. पीक ही गेलं धान गेलं त्या अधिक गुरांची वैरण देखील गेल्याने त्यांची चिंता वाढली आहे. तर सरकारने तसेच संबधीत खात्याने त्यांचे सरसकट पंचनामे करून त्यांना नुकसानभरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांच्या वतीने केली जात आहे..... अनिल महाडिक खांब

