पुगाव - कोलाड (नंदकुमार कळमकर)
मिळालेल्या माहिती नुसार कोणतेही जीवित हानी नाही...
कोलाड भिरा मार्गांवरील दुरटोली फाट्यानाजिक मंगळवार दि.७ नोव्हेंबर २०२३ रोजी मध्यरात्री ट्रेलर पलटी झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे...सुदैवाने कोणतेही जीवित हानी झाली नाही... मिळालेल्या माहिती नुसार दुरटोली फाट्यानजिक रस्त्याच्या बाजूला ट्रेलर पलटी झाला असुन कोणतेही जीवित हानी झाली नाही...कोलाड भिरा मार्ग पूर्णपणे डोंगरा मधून जाणारा मार्ग असुन या मार्गांवर रस्त्याला जागजागी वळणे आहेत...या मार्गांवरून जाणाऱ्या ट्रेलर चालकांच्या कानाला नेहमीच मोबाईल असतो... यामुळे रस्त्याला असणाऱ्या वळणामुळे समोरून येणारी वाहने चटकन लक्षात येत नसल्याने वाहन चालकाचा ताबा सुटतो यामुळे मार्गांवर नेहमीच अपघातात होत असतात...व अनेकांचा नाहक बळी जातो.
विळे निजामपूर येथे पोस्को कंपनी असल्यामुळे या मार्गांवर नेहमी अवजड वाहनांची वर्दळ सुरु असते यामुळे अनेक वेळा वाहतूक कोंडी ही निर्माण होते.परंतु दुरटोली फाट्या जवळ रस्त्याच्या बाजूला ट्रेलर पलटी झाल्यामुळे वाहतूक कोंडी झाली नाही...
