महाराष्ट्र वेदभुमी

सानेगांव यशवंतखारच्या उपसरपंचपदी परेश म्हात्रे




रोहा - प्रतिनिधी ;- 

विभागाला लवकरच रुग्णवाहिका उपलब्ध करून देणार-नंदकुमार म्हात्रे, शेकाप नेते

स्थानिक विकास आघाडीचे निवडणून आलेले सरपंच, उपसरपंच व सर्व सदस्यांना सर्वप्रथम पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो  ज्या विस्वासने मतदारांनी निवडून दिला आहे त्यांच्या विश्वासाला तडा ना जाऊन देता जोमाने विकास कामाला लागा आम्ही जेष्ठ मंडळी कायम तुमच्या पाठीशी आहोत या वेळी वीस वर्षे जुन्या आठवणींना उजाळा देत ते म्हणाले मी वीस वर्षे आदी  ज्या वेळी राजकीय क्षेत्रात आलों त्या वेळी मला सुद्धा अपयश आले पण मी मागें वळून ना पाहता काम करत राहीलो आणि राजकारणात यश मिळवले ते आज तुमच्या समोर आहे निवडून आले सर्वांनी पक्ष विरहित सर्व पक्षांचा सहकार्य घेऊन एकत्र विकास कामे करा मी या विभागासाठी  लवकरच एमबुलेंश उपलब्ध करून देईन असे मत अध्यक्षीय भाषणात माजी जिल्हा परिषद सदस्य नंदकुमार म्हात्रे यांनी मांडले ते गृप ग्रामपंचायत सानेगांव यशवंतखार च्या सरपंचपद भार स्वीकारताना व उपसरपंच निवडी च्या वेळी बोल होते या वेळी माजी पंचायत समिती सभापती लक्ष्मण माहले शुभेच्छा भाषणात म्हणाले लोकांनी ज्या विस्वासानी  निवडून दिला आहे...


त्यांचा विश्वास राखा निवडका झाल्या राग द्वेष ना करता एकत्र येऊन खेळीमेळीने विकास कामे करा या वेळी राजेश वाघमारे व अन्य जेष्ठ ग्रामस्थांनी सर्व नवं निर्वाचितना शुभेच्छा दिल्या या निवडणुकीत सरपंचपदी निर्मला वाघमारे , उपसरपंचपदी परेश म्हात्रे सहसदस्य म्हणून सुषमा दिवकर, योगिता ठाकुर, समिधा वाघमारे, गीता दिवकर, सर्वेश मोरे निखिल जाधव, अंजली ठाकूर हे निवडून आले आहेत या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून नंदकुमार म्हात्रे, लक्ष्मण माहले, हेमंत ठाकुर, राजेश वाघमारे, गणेश मढवी आदी उपस्थित होते..

Post a Comment

Previous Post Next Post