शहानवाज मुकादम /रोहा
कार्यकर्ते नाराज असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना पत्र देऊन कोकबण विभागात कामे सुरु करणार- ॲड मनोजकुमार शिंदे...
दि:१९/११/२०२३,तालुक्यातील खांबेरे गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदा च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दगा फटका व विश्वास घात केला आहे. यापुढे तटकरेंच्या राष्ट्रवादी पक्षा सोबत रोह्यात शिवसेना शिंदे गट काम करणार नसल्याचे तालुका प्रमुख ॲड,मनोजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत केले जाहीर...
राज्याच्या राजकारणाप्रमाणे रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गट तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यकर्ते राजी नसताना सुध्दा कार्यकर्त्यांनी तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोबत काम केला परंतु खांबेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदा च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या सवई गुणाप्रमाणे सर्व काही ठरलेला असताना सुद्धा आमच्या सोबत दगा फटका व विश्वास घात केला आहे. ठरल्याप्रमाणे खांबेरे ग्रामपंचायतीत उपसरपंच शिवसेना शिंदे गटाचा बसणार होता पण ऐनवेळी विश्वास घात केला हा विश्वास घात माझ्यासह कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे, म्हणून मी या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन कळवणार आहे...आणि यापुढे रोहा तालुक्यात आम्ही तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणार नाही असा ठाम निर्णय आम्ही केला असे मत रोहा तालुका शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख ॲड मनोज कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला....
ते पुढे म्हणाले काही लोकांना वाटलं होतं शिंदे सेना बॅकफूटवर गेली आहे पण शिंदे सेना जोरात होती आहे आणि पुढेही राहील हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे...
या निवडणुकीत रोहा तालुक्यात नेहमी चर्चेत आसलेल्या चणेरा ग्रामपंचायतीवर आम्ही भगवा फडकविला आहे...त्याचप्रमाणे सानेगाव यशवंतखार ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी करुन सरपंच आमचा बसला आहे...
खांबेरे ग्रामपंचायतीत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विश्वास घात केल्याने आता सोबत काम करणार नाही, उलट आता कोकबण विभागात उद्यापासून ठामपणे उपस्थित राहून कामे सुरु करणार आसुन लवकरच आमदार महेंद्र शेठ दळवी,आमदार भरत शेठ गोगावले,आमदार महेंद्र थोरवे यांची मोठी सभा घेऊन आम्ही काय करु शकतो हे दाखवून देऊ आसे रोहा तालुका प्रमुख अॅड, मनोजकुमार शिंदे यांनी समक्ष सागितले...
