महाराष्ट्र वेदभुमी

तटकरेंच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विश्वास घात केला,ऍड.मनोज शिंदे, तालुकाप्रमुख शिंदे गट

 


रोहा दि. १९ नोव्हें. प्रतिनिधी :-

यापुढे राष्ट्रवादीपक्षासोबत आम्ही काम करणार नाही

रोहा तालुक्यातील खांबेरे गृप ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदा च्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या सोबत दगा फटका व विश्वास घात केला आहे. यापुढे तटकरेंच्या राष्ट्रवादी पक्षा सोबत आम्ही काम करणार नसल्याचे शिवसेना शिंदे गटाचे तालुकाप्रमुख ऍड. मनोजकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहे...

राज्याच्या राजकारणाप्रमाणे रोहा तालुक्यात शिवसेना शिंदे गट तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत कार्यकर्ते राजी नसताना सुध्दा आम्ही कार्यकर्त्यांना तालुक्यातील बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सोबत काम केला पण खांबेरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या सवई गुणाप्रमाणे सर्व काही ठरलेला असताना सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आमच्या सोबत दगा फटका व विश्वास घात केला आहे...ठरल्याप्रमाणे खांबेरे ग्रामपंचायतीत उपसरपंच शिवसेना शिंदे गटाचा बसणार होता पण ऐनवेळी आमच्यासी विश्वास घात केला हा विश्वास घात माझ्यासह कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागला आहे म्हणून मी या बाबतीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन कळवणार आहे...आणि यापुढे रोहा तालुक्यात आम्ही तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासोबत काम करणार नाही असा ठाम निर्णय आम्ही केला असे मत रोहा तालुका शिवसेना शिंदे गट तालुका प्रमुख ॲड मनोज कुमार शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला..

- आम्ही बॅकफूटवर गेलेलो नाही -

ते पुढे म्हणाले काही लोकांना वाटलं होतं शिंदे सेना बॅकफूटवर गेली आहे पण शिंदे सेना जोरात होती आहे आणि पुढेही राहील हे या निवडणुकीत सिद्ध झाले आहे या निवडणुकीत बलाढ्य चणेरा ग्रामपंचायत पूर्णपणे आम्ही घेतलीं आहे,त्याप्रमाणे सानेगांव यशवंतखार ग्रामपंचायतीत स्थानिक आघाडी करून सरपंच आमचा बसला आहे...

कोकबन विभागात कामे सुरू करणार -

आज पर्यंत राज्यात युती प्रमाणे सोबत काम करण्याचा प्रयत्न करत होतो पण खांबेरे ग्रामपंचायतीत तटकरे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विश्वास घात केल्यानं आता सोबत काम करणार नाही उलट आता कोकबन विभागात उद्यापासून ठामपणे उपस्थित राहुन कामे सुरू करणार आहोत...

लवकरच आमदार महेंद्र सेठ दळवी, आमदार भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्र थोरवे यांची मोठी सभा घेऊन आम्ही काय करु शकतो हे दाखवून देऊ असे तालुका प्रमुख अॅड मनोज कुमार शिंदे यांनी सांगितले, यावेळी उपतालुकाप्रमुख उदेश वाडकर , शहर प्रमुख मंगेश रावकर, उपशहरप्रमुख निलेश शेडगे आदी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post