महाराष्ट्र वेदभुमी

अजंठा,अपोलो जलवाहतूक कंपनीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होवून देणार नाही -जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे.अन्याय विरोधात लढा देण्याची बाळासाहेबांची शिकवण..




अलिबाग(विशेष प्रतिनिधी):

कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे कळताच अधिकाऱ्यांना खडसावून विचारला जाब,मोर्चा काढण्याचा दिला इशारा

अलिबाग ते गेटवे जलवाहतूक करणाऱ्या अजंठा,अपोलो कंपनीतील कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असल्याचे कळताच उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, तालुका संघटक कृष्णा कडवे यांनी अजंठा,अपोलो कंपनीतील अधिकाऱ्यांना खडसावून जाब विचारला...स्थानिक कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केल्याचे समजताच झिराड पोलीस ठाण्यातील सहा.पोनि गोविंद पाटील यांची भेट घेवून कंपनी विरोधात मोर्चा काढण्याचा इशारा दिला...



जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रेंनी अजंठा,अपोलो कंपनीतील कर्मचाऱ्यांचे लावले अनेक प्रश्न मार्गी 

परंतु पोनि गोविंद पाटील यांनी मोर्चा काढू नका असे सांगून सामंज्यस्यांने कंपनी अधिकाऱ्यांना समजावून कोणत्याही कर्मचाऱ्यांना कमी न करता, कोणावर ही अन्याय न करता, कमी केलेल्या कामगारांना पुन्हा रुजू करण्याचे सांगितले...तर अधिकाऱ्यांने ते मान्य करून रुजू करतो असे देखील आश्वासन दिले...अलिबाग ते गेटवे जलवाहतूक करणाऱ्या अजंठा, अपोलो कंपनीतील कर्मचारी यांचे अनेक प्रश्न यावेळी जिल्हाप्रमुख सुरेंद्र म्हात्रे यांनी मार्गी लावले, कर्मचाऱ्यांच्या वार्षिक पगारवाढी विषयाची चौकशी करण्यात आली... यावेळी जिल्हा प्रमुख सुरेंद्र म्हात्रे, तालुका प्रमुख शंकर गुरव, जिल्हा समन्वयक अमीर (पिंट्या) ठाकूर, तालुका संघटक कृष्णा कडवे, शिवसैनिक व अजंठा, अपोलो कंपनीतील स्थानिक ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post