शहानवाज मुकादम / रोहा
तालुक्यातील शेडसई ग्रामपंचायत नेहमीच चर्चेत राहिली आहे..लक्ष्मीखार बसस्टँड असो की शेडसई अंगणवाडी इमारत, तसेच घरकुळ प्रतिक्षेची ड यादी वरील स्थगिती आणि यानंतर विश्र्वास अविश्र्वास ठराव असे अनेक विषयातून ग्रामपंचायतीची निवडणूक २०२१मध्ये झाल्यापासून चर्चेत आली आहे...त्यातच गोफण गावचे युवा नेतृत्व समाजसेवक दिनेश पांडूरंग कडू यांनी एप्रिल २०२१ रोजी केलेल्या तक्रारी अर्जानुसार ग्रामपंचायत शेडसईच्या उपसरपंच यांचे सदस्य पद रद्द झाल्याचे आदेश मा.जिल्हाधिकारी रायगड यांनी दिल्याने आता संपूर्ण रायगड जिल्हाचे लक्ष आता वेधून घेतले आहे...हा आदेश मा.जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी
महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चा मुंबई अधिनियम क्र.३ चे कलम १४ फ चे तसेच कक्षअधिकारी, महाराष्ट्र शासन यांचेकडील दिनांक २९/०७/२०२३ रोजीच्या पत्राचे अवलोकन केले असता सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू, उपसरपंच ग्रामपंचायत शेडसई ह्या दि.१०/०२/२०२१ ते दि. २७/०९/२०२२ पर्यंत ग्रामपंचायत शेडसई येथे सदस्य व उपसरपंच तसेच केंद्रचालक या दोन्ही पदाचा उपभोग घेतल्यामुळे त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यात आली असा आदेश दिले आहे...
तसेच सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू यांनी ग्रामपंचायत शेडसई येथे सदस्य व उपसरपंच तसेच केंद्रचालक या दोन्ही पदाचा उपभोग घेतल्याचे स्पष्ट झाल्याने सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू यांचे सदस्य व उपसरपंच पद रद्द करणे ही न्यायीक बाब असल्याचे आदेशात नमूद केले आहे...
मा.जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांनी तसा आदेश सोमवार दिनांक ९/१०/२०२३ रोजी दिला आहे.त्यानुसार सौ.प्राजक्ता प्रभाकर कडू यांचे सदस्यत्व रद्द झाले असल्याची माहिती व ते पत्रक श्री दिनेश पांडुरंग कडू यांनी रायगड स्वाभिमान कडे दिली आहे...
