महाराष्ट्र वेदभुमी

रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांस रायगड जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा सन्मान



महाड विशेष प्रतिनिधी 

महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री सांस्कृतिक कार्य मान्यवरांच्या हस्ते सलग दुसऱ्यांदा गौरव

महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ पुरस्कार २०२३चे पारितोषिक वितरण समारंभ नुकतेच रवींद्र नाट्यमंदिर प्रभादेवी इथे आयोजित करण्यात आले होते...या समारंभामध्ये रायगड जिल्ह्यामधील लोकप्रिय सुप्रसिद्ध आदर्श मंडळ पुरस्कार विजेते रोहिदास तरुण विकास मंडळ महाड यांस महाराष्ट्र शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाने श्री सुधीर मुनगंटीवार मंत्री सांस्कृतिक कार्य आणि सन्माननीय मान्यवर यांच्या शुभहस्ते सलग दुसऱ्यांदा गौरविण्यात आले आहे... 

या पारितोषिक सोहळ्यामध्ये मंडळाचे विद्यमान अध्यक्ष श्री विशाल रमेश महाडिक, उपाध्यक्ष- संजय कापडेकर, सचिव-रोशन गोरेगावकर, खजिनदार- परेश वाळंज, कार्याध्यक्ष- नवीन परमार, सल्लागार-नरेंद्र महाडिक, प्रमोद महाडिक, शिवाजी महाडिक, धनंजय महाडिक व ओमकार महाडिक उपस्थित होते...

अध्यक्षानी सदस्य,पदाधिकारी,आदी पत्रकार व प्रसिद्धी माध्यम यांचे सहकार्याबाबत मानले आभार 

अध्यक्षांच्या मनोगतामध्ये मंडळाचे सर्व सदस्य, पदाधिकारी, रहिवासी, हितचिंतक, महिला मंडळ सर्व सदस्य व पदाधिकारी, देणगीदार, विद्यमान परीक्षक, महाड नगर परिषद, महाड पोलीस स्टेशन, प्रांत ऑफिस, पत्रकार व प्रसिद्धी माध्यम यांनी सहकार्य केल्याबद्दल मंडळाकडून मनःपूर्वक आभार मानले व अभिनंदन करण्यात आले...

Post a Comment

Previous Post Next Post