महाराष्ट्र वेदभुमी

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोहा तालुका मार्यादित दरवर्षी प्रमाणे गणपती मकर आरास स्पर्धेचे आयोजन स्पर्धेसाठी झाली होती ५५ ते ७० नाव नोंदणी



धाटाव रोहा प्रतिनिधी(महेश वाडकर)

भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्त्रोची चांद्रयान ३ मोहीम फत्ते बाप्पाच्या उस्तव सजावटीसाठी चांद्रयान देखावा 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे रोहा तालुका मार्यादित दरवर्षी प्रमाणे गणपती मकर आरास स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. रोहा तालुक्यातून या स्पर्धेसाठी ५५ ते ७० नाव नोंदणी झाली होती...समाजाला हेवा वाटेल असे कित्येक प्रकारच्या आरास करण्यात आल्या होत्या... यामध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजेचं इस्त्रोची चांद्रयान ३ मोहीम फत्ते झाली आहे...चांद्रयान ३ चे चंद्रावरील सॉफ्ट लँडिंग यशस्वी झालं आहे... भारतानं अखेर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवण्याचा मान पटकावला आहे...चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरवणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे...तसेच या महान कार्याची खुशी ही भारतातील प्रत्येक नगरीला ही तितकीच झाली असताना नुकताच पार पडलेला आपल्या लाडक्या बाप्पाचा म्हणजेच गणपती बाप्पाच्या उस्तव सजावटीसाठी मोठ्या प्रमाणात चांद्रयानाचा देखावा कारण्यात आला...तसेच  रोहा तालुक्यामधील अरे खुर्द गावामध्ये निकेत चोंदे यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने चांद्रयान-३ चे देखावा तयार केला होता... त्याचा प्रथम क्रमांक म्हणून गौरव करण्यात आला...


पन्हाळगडाच्या वेढ्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असता प्रसंगाचा देखावा

आपल्या सर्वांच्या महितीतला मोठा इतिहास म्हणजे १३ जुलै, १६६० रोजी पन्हाळगडाला पडलेल्या वेढ्यातून निसटून निघालेले छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडाकडे जात असताना सिद्दी मसूदच्या सैन्याने त्यांना येथे गाठले असता झालेल्या निकराच्या लढाईत बाजी प्रभू देशपांडे, त्यांचे भाऊ फुलाजी देशपांडे व त्यांच्यासह मोजक्या सैनिकांनी ही खिंड जबरी लढवली..व आदिलशाही सैन्याला थोपवून धरले...आणि  महाराज सुखरूप विशाळगडावर पोहचले...या प्रसंगाचा देखावा आशिष विशाल भगत बोरघर यांनी गणपती बाप्पाच्या सजावटी साठी केला असता त्याचाही  द्वितीय क्रमांक म्हणून गौरव करण्यात आला...


गणपती मकर सजावटीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये वारकरी मंडळी कीर्तन करत उभे विलोभनीय देखावा

वारकरी संप्रदाय हा विठ्ठल भक्तांचा साधासुधा भक्तीसंप्रदाय नाही तर शैव, नाथ, दत्त, सूफि इत्यादी पंथातील चिंतनशील संस्कारक्षम अशा भक्तांना सामावून घेतलेले ते एक सांस्कृतिक केंद्र आहे...बाह्य परिस्थीती ही पूर्व कर्मानुसार प्राप्त होते; त्यात आपण बदल करु शकत नाही...पण भक्ती पंथाच्या सहाय्याने अध्यात्मिक उन्नती साधता येईल, नैतिक सामर्थ्य वाढवता येईल व प्रापांचिक दु:खावर मात करता येईल असा विश्वास वारकरी पंथाने लोकांच्यात निर्माण केला...लौकिक जीवनात आपल्या वाट्याला आलेली कर्तव्ये यथासांग पार पाडूनच वारकरी भक्तीमध्ये लीन होताना दिसतात...तसेच कीर्तन, हरिपाठ,भजन अशा स्वरूपात वारकरी परमेश्वराची भक्ती व जीवन कशा पद्धतीमध्ये व्यतीत करावी याचा प्रसार वारकरी सांप्रदाय करत आला आहे...गणपती मकर सजावटीमध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीमध्ये वारकरी मंडळी कीर्तन करत उभे आहेत असा विलोभनीय देखावा तयार केला असता रोहा तालुक्यामधील वांदेली गावातील युवक आशिष कडव यास विठ्ठल देखाव्यासाठी तृतीय क्रमांक म्हणून गौरविण्यात आले..

स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी रोहा तालुक्यातील महाराष्ट्र सैनिक उपस्थित

या स्पर्धेच्या बक्षीस वितरणावेळी रोहा तालुका अध्यक्ष अक्षय रटाटे, उपतालुका अध्यक्ष सुरज मुटके, रोहा शहर अध्यक्ष अमित पवार, धाटाव विभाग अध्यक्ष महेश दादा वाडकर, माथाडी कामगार सेना सरचिटणीस कल्पेश शेळके, उपसरचिटणीस प्रताप खंडारे, धाटाव युनिट अध्यक्ष रितेश कीर्तने, महाराष्ट्र सैनिक नितीन मुंढे, महेश मोहिते, कुणाल मोरे आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते...

Post a Comment

Previous Post Next Post