रोहा दि १२/१०/२०२३ विशेष प्रतिनिधी
सानेगाव जेटीवर व्यवस्थापन आणि स्थानिकांचा संघर्ष पेटला.
रोहा तालुक्यातील सानेगाव येथे इंडो एनर्जी इंटरनॅशनल जेटीवर बार्जच्या माध्यमातून इस्पात कंपनीसाठी कोळशाची आवक होते... जेटीवर उतरलेल्या कोळशाची इस्पात कंपनीसाठी वाहतूक स्थानिकांच्या डंपरने केली जाते... जेटी व्यवस्थापन आणि स्थानिक डंपर मालिकांमध्ये वाहतूक दर वाढवून देण्याबाबत संघर्ष सुरू आहे... जेटी व्यवस्थापन पिळवणूक करीत असल्याची स्थानिकांची तक्रार आहे..
विरोध करणाऱ्या स्थानिक डंपर मालकाला गाडीने उडवले त्यामध्ये गंभीर जखमी..महिलांचा पेटवून घेण्याचा प्रयत्न
अशातच जेटी व्यवस्थापनाने स्थानिकांना डावलून बाहेरील डंपर घेऊन कोळसा वाहतूक सुरू केला...विरोध करणाऱ्या स्थानिक डंपर मालकाला गाडीने उडवले, त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला...झालेल्या घटनेचा उद्रेक होत स्थानिक संतप्त झाले व अलिबाग रोहा मार्गावर रास्ता-रोको करीत कोळशाच्या गाड्या अडवल्या...संतप्त महिलांनी स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला... त्यामुळे वातावरण तंग झाले होते... पोलिसांना संघर्षाची खबर मिळताच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात झाले...पोलिस उपअधीक्षक सोनाली कदम यांनी सामोपचाराने परिस्थिती नियंत्रणात आणली...
प्रतिक्रिया:-
आम्हाला रोजगार मिळावा म्हणून आम्ही जेट्टी ला परवानगी दिली आणि आता आमचा रोजगार हिरावून घेतला जात असेल तर आम्ही हे कदापी सहन करणार नाही...स्थानिकांना गाडीने उडवणाऱ्या उद्दाम मॅनेजर मंगेश कामथे याच्यावर मनुष्यवाधाचा गुन्हा दाखल व्हावा-नंदकुमार म्हात्रे अध्यक्ष, चालक-मालक व वाहक वाहतूक सहकारी संस्था...


