कोलाड प्रतिनिधी:(श्याम लोखंडे)
एकाच दिवशी या मार्गावर भयानक दोन विचित्र अपघात घडले असून यात दोघेही गंभीर जखमी
मुबंई गोवा महामार्गाला जोडला गेलेला उपरस्ता म्हणजे खांब देवकान्हे पालदाड मार्ग या मार्गावर भयानक पडलेले खड्डे आणि भयानक वाढलेले काटेरी झुडपे धोकादायक असलेले वळणे यामुळे आता पुन्हा प्रवाशी नागरिक संतापले असून काळ एकाच दिवशी या मार्गावर भयानक दोन विचित्र अपघात घडले असून यात दोघेही गंभीर जखमी झाले आणि त्यात दोन्हीं दुचाकीचे मोठे नुकसान झाले असल्याचे समजले आहे...तर अपघातात जखमी झालेले उपचार घेऊन घरी परतले आहेत...
खांब पालदाड अरुंद मार्ग हा दिवसंदिवस धोकादायक बनत आहे अनेकदा केले होते भाकीत
या विषयी सविस्तर माहिती अशी की खांब पालदाड अरुंद मार्ग हा दिवसंदिवस धोकादायक बनत आहे असे अनेकदा भाकीत केले होते या मार्गावर भयानक पडलेले खड्डे अरुंद मार्ग तसेच धोकादायक वळणे दुतर्फा मार्गालगत वाढलेली मोठं मोठी काटेरी झुडपे यामुळे नेहमीच लहानसहान अपघात होतात..परंतु मागील काही दिवसांपूर्वी या मार्गावरील देवकान्हे धानकान्हे व देवकान्हे पालदाड दरम्यान एकाच दिवशी दुचाकी वाहने समोरासमोर धडकल्याने दोन अपघात घडले असून देवकान्हे धानकान्हे दरम्यान झालेल्याअपघातात दोघेजण जखमी झाले तर सदरच्या घडलेल्या घटनेमुळे दोघांच्या दुचाकीचे खुप मोठे नुकसान झाले असल्याचे समजले आहे...मात्र दैव बलवत्तर म्हणून दोघेही सुखरूप बचावले तर किरकोळ जखमी झाले असल्याने ते उपचार घेत घरी सुखरुप परतले...
बुजवले खड्डे हे पुन्हा उखडले गेले त्यामुळे हे खड्डे एक दोन दिवसांचे पाहुणे ठरले असल्याचे उघडपने
धानकान्हे देवकान्हे दरम्यातील खड्यांवर आजतागायत दुरुस्ती नाहीं तर अरुंद मार्ग त्यात दुतर्फा मार्गाला वाढलेली कटेरी झुडपे त्यामुळे समोरासमोर आलेली वाहने दिसतच नाहीत तर प्रवाशी रिक्षा तसेच मोठी फोर व्हिलर गाडी आली तर किमान एका वाहन चालकाला किमान पाचशे ते सहाशे मीटर मागे वाहन करावी लागते त्यात दुचाकीला चालकाला देखील तारेवरची कसरत करावी लागते खांब देवकान्हे मार्गाची बोंब अथवा मागणी ही गेली अनेक वर्षाची आहे...मात्र याला वाली कोण असाच संतापजनक सवाल सर्व सामान्य नागरिकांच्या मनात येत आहे...तसेच उडदवणे पालदाड पुलाकडे जाणाऱ्या खड्यांवर मागील काही दिवसांपूर्वी थातुरमातुर दुरुस्ती केली मात्र केवळ मुठवली, बाहे, देवकान्हे येथे आमदारांचा दौरा तसेच त्यांच्या कार्यक्रम दरम्यान हे खड्डे बुजले गेले असावे अशी चर्चा होत आहे... तर बुजवले खड्डे हे पुन्हा उखडले गेले त्यामुळे हे खड्डे एक दोन दिवसांचे पाहुणे ठरले असल्याचे उघडपने दिसून येत आहेत तर बुजवले गेलेल्या खड्यातील माती उडून गेल्याने त्यातील खडी रस्त्याभर पसरल्याने दुचाकीस्वार घासरून पडत असल्याच्या घटना घडत आहेत...
मार्गासाठी स्थानिक पुढारी नेते मंडळी एकटवली बैठका वर बैठका झाल्या.. निष्पन्न काय झाले हे गुलदस्त्याच
रायगडच्या राजकारणात गेली पंचवीस वर्ष कायम राज्य सरकारच्या मंत्री मंडळात येथील आमदारांचा मंत्री म्हणुन समावेश आहे... हे नाकारता येत नाही मात्र शिवरायांच्या राजधानीच्या जिल्हयातील ग्रामीण भागातील जनता ही आजही काही मूलभूत सुविधांपासून तसेच विकासांपासून वंचित आहेत ही शोकांतिका असल्याचे बोलले जात आहे...हे नाकारता येत नाही कारण कोलाड खांब देवकान्हे धामणसई या भागात आजही नागरिकांना पुरेशा मूलभूत सोयी सुविधा नसल्याने दिसून येत आहे त्यात गेली वर्षभर या मार्गासाठी स्थानिक पुढारी नेते मंडळी एकटवली होती बैठका वर बैठका झाल्या परंतू त्यात निष्पन्न काय झाले हे गुलदस्त्याच तसेच काही अधिकारी येऊन खांब देवकान्हे या मार्गाची पाहणी करत कोणी माप घेतली कोणी दुर्बीण लावली नंतर बोंब सुरू झाली काहीची शेती जाईल गावातील घरे जातील रस्त्यालगत असलेले मंदिर जात आहेत हा मार्ग तीस ते बत्तीस फूट रुंद होणार या चर्चेला उधाण आले होते...मात्र यावर कार्यतत्पर वरिष्ठ नेते मंडळी यांनी तसेच संबधीत खाते यांनी तद्नंतर कोणती भूमिका बजावली याचे ही गणित आजतागायत कोणाला कळले नाही...
वाढली काटेरी झुडपे न काढल्याने वळणावर होत आहेत अपघात याला जबाबदार कोण ? असा सवाल
उदडवणे पालदाड पुलाकडे जाणारा मार्ग खड्डे पुन्हा जैसे थे तसेच अर्धवट त्यात दुतर्फालगत काटेरी झुडपे या मार्गावर वाढली काटेरी झुडपे न काढल्याने वळणावर होत आहेत अपघात याला जबाबदार कोण ? असा सवाल येथील ग्रामस्थ नागरिक करत आहेत...या मार्गावरील अर्धवट काढलेली काटेरी झुडपे आता प्रवाशी नागरिकांच्या जीवावर वेतली आहेत... धोकादायक वळणं व भयानक वाढलेली काटेरी झुडपे यामुळे समोरील येत असलेले वाहनं दिसत नसल्याने दररोज आपघातास कारणीभूत ठरत आहेत...
प्रतिक्रिया
मागील पाच वर्षांपूर्वी खांब निडी तर्फे अष्टमी या मार्गाचे काम मुखमंत्री ग्रामीण सडक योजनेअंतर्गत करण्यात आले...परंतु ते काम निडीतर्फे अष्टमी ते देवकान्हे या दरम्यान केले गेले...देवकान्हे खांब हे चार ते पाच किलोमीटर अंतरावरील काम तसेच नाल्यावरील साकव हे काम करण्यास विलंब झाला आहे.. त्यामुळे हा मार्ग सध्या धोकादायक बनला आहे.. रायगडात अनेक ठीक ठिकाणची रस्त्यांची कामे विविध योजनेंतर्गत केली जातात मात्र एक खांब पालदाड मार्गाचे काम अद्याप अर्धवट अवस्थेत आहे...मागील वीस ते पंचिविस वर्षाचा आढावा घेतला तर एकही वर्ष असा गेला नाही की मंत्रिमंडळात रायगड जिल्ह्यातील मंत्री नाही तरी देखील विकासापासून हा भाग वंचीत राहिल्याचे समोर येत आहे...त्यामुळे या मार्गाच्या अर्धवट असलेल्या कामाला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिकांच्या डोळ्यासमोर उभा राहिला आहे,तरी संबधित अधिकारी वर्गाने याची गांभीर्याने दखल घेत रस्त्यालगतची वाढलेली काटेरी झुडपे व रस्याची दुरुस्ती करावी अशी मागणी प्रवासी वर्गातून केली जात आहे...आदिवासी सामाजिक कार्यकर्त्या गुलाबताई वाघमारे .
.jpeg)
