माणगाव प्रतिनिधी (सिकंदर आंबोणकर)
हवामान सूचना ३०/०९/२०२३
पूर्व मध्य अरबी समुद्र व महाराष्ट्र गोवा किनारपट्टी लगत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे समुद्र खवळलेल्या स्थितीत असणार आहे...जिल्हातील मच्छीमार, नागरिक व पर्यटकांना व सर्व शासकीय विभाग प्रमुख यांना सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे...सर्व विभाग प्रमुखांनी मुख्यालयी उपस्थित रहावे...
पुढील ४८ तासात मच्छीमारीसाठी बोटी समुद्रात घेऊन जाऊ नयें...
पर्यटकांनी देखील समुद्राच्या पाण्यात पोहण्यासाठी उतरू नये...
समुद्र खाडी किनाऱ्यावरील सखल भागांतील नागरिकांनी सतर्क रहावे...
वयोवृद्ध, अपंग, गरोदर महिला, लहान मुले यांची काळजी घ्यावी...
पुरेसा औषध साठा, पिण्याचे पाणी, ड्राय फूड, बॅटरी, टॉर्च, मेणबत्ती, रेडिओ सोबत बाळगावा...
अनावश्यक असेल तर घराच्या बाहेर पडू नये...
विजेचे खांब, झाडे यापासून लांब राहावे...
कोणत्याही आपत्कालीन प्रसंगी जवळच्या पोलीस स्टेशन तसेच तहसीलदार यांचे कार्यालयास सम्पर्क साधावा...
जिल्हा नियंत्रण कक्ष
जिल्हाधिकारी कार्यालय अलिबाग
०२१४१२२२११८ (02141 222118)