महाराष्ट्र वेदभुमी

रोह्यातील प्रगतिशील शेतकरी गणेश भगत यांची. नैसर्गिक शेती निरीक्षक प्रशिक्षणास आकोल्यास निवड



रोहा प्रतिनिधी( शहानवाज मुकादम )

तालुका रोहा येथील चणेरा विभागाचे प्रगतिशील शेतकरी श्रीमान,गणेश भगत यांची नैसर्गिक शेती निरीक्षक प्रशिक्षणास आकोल्यात निवड. 

 डॉक्टर पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन. 

 अकोला येथे सन:२०२२/२३मध्ये  महाराष्ट्रात स्थापित झालेल्या  परंपरागत कृषी विकास योजनांच्या  पाचशे गटांच्या अंतर्गत नियंत्रण निरीक्षक पदी चणेरा- रोहा रायगड येथील बिजामृत फार्मर प्रोडूसर लिमिटेड कंपनीचे व भारतीय कृषक समाज संस्थेचे रोहा तालुका अध्यक्ष गणेश बाळाराम भगत यांची प्रशिक्षणासाठी निवड झाल्याचे पत्र उज्वला वानखेडे प्रकल्प संचालक आत्मा रायगड यांनी दिले आहे...सदरचे प्रशिक्षण दि: ४ ते ६ ऑक्टोबर २३,पर्यंत डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कृषक भवनात होणार आहे...

तेल्हारा येथील जैविक शेतकरी उत्पादक कंपनीत भेट,शेगाव येथील राणा उत्पादक कंपनीत भेट

 यामध्ये सेंद्रिय प्रमाणिकरण, नियंत्रण प्रणालीसंकल्पना, सेंद्रिय नैसर्गिक शेती, कृषी विकास योजना माती परीक्षणाचे महत्व, शेतकरी उत्पादक कंपनी नोंदणी व्यवस्थापन, सेंद्रिय उत्पादन, विपणन, खरेदी, साठवण, रेकॉर्ड,आर्थिक व्यवस्थापन, डॉक्टर पद्मश्री विद्यापीठ सेंद्रिय प्रशिक्षण केंद्रास भेट, तेल्हारा येथील जैविक शेतकरी उत्पादक कंपनीत भेट, शेगाव येथील राणा उत्पादक कंपनीत भेट, असा प्रशिक्षण कार्यक्रम आहे...

भूषण जयपाल पाटील यांनी मानले अभिनंदन 

 कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीसाठी निरीक्षक म्हणून  रायगड जिल्ह्यातील रोहा येथील श्री गणेश बाळाराम भगत, श्रीमती प्रियांका श्री संभाजी कांबळे, भारत राम पाटील, रामभाऊ डिके, महादेव गणपत मोहिते यांची निवड झाल्याबद्दल महाराष्ट्र कृषक संघटनेचे राज्य उपाध्यक्ष रायगड भूषण जयपाल पाटील यांनी या शेतकऱ्यांचे व  रायगड जिल्हा कृषी अधिकारी व प्रकल्प संचालक आत्मा उज्वला वानखेडे यांचे अभिनंदन मानले आहे...

Post a Comment

Previous Post Next Post