पुगांव - खांब प्रतिनिधी ( नंदकुमार कळमकर ) :
जय बजरंग क्रीडा मंडळ व शिवतेज मित्र मंडळाचे सार्वजनिक गणपती बाप्पांना पारंपारिकरित्या भक्ती भावनेने निरोप
दहा दिवसांच्या गणपती बाप्पांच्या विसर्जनालाही पावसाची संततधार होती पण गणेश भक्ताने त्याची तमा न बाळगता बाप्पाचा जयजयकार करत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या अशा जय घोषात भक्तिमय वातावरणात खांब पुगांव गावातील जय बजरंग क्रीडा मंडळ व शिवतेज मित्र मंडळाचे सार्वजनिक गणपती बाप्पांचे विसर्जन पारंपारिकरित्या लाठीकाठी, आखाडे, ढोल ताशे, खालू बाजा, बेंजोच्या तालावर वाजत गाजत व फटाक्यांच्या आतिषबाजीत गणेश भक्तांनी गुलाल फुलांची उधळण करत आपल्या लाडक्या बाप्पाला मोठ्या भक्ती भावनेने निरोप दिला...
दहा दिवस.सार्वजनिक उपक्रमात अथक परिश्रम करणर्या कार्यकर्त्यांचे ग्रामस्थांनी केले कौतुक
ग्रामपंचायत पुगावने गणपतीपूर्वीच येथील विसर्जन घाट व जाणारा मार्ग तसेच तलाव परिसर स्वच्छता करण्यात आली होती...दुपारी चार वाजल्यानंतर वाजत गाजत, तर काही गुलाल फुले उधळत, लेझिम, टाळ मृदुंग, ढोल ताशाच्या गजरात व वाजत गाजत श्री गणरायांचे विसर्जन गावा नजिकच्या तलावात करण्यात आले प्रसंगी यावेळी भक्तांची मोठी गर्दी उसळली होती...शिवतेज मित्र मंडळाचे अध्यक्ष अशोक झोलगे व जय बजरंग मंडळाचे अध्यक्ष राम कळमकर, उपाध्यक्ष व सर्व सदस्य यांनी गेली दहा दिवस अथक परिश्रम घेत विसर्जन साठी खूप मेहनत घेतली तर गेली अनेक वर्ष या सार्वजनिक उपक्रमाचे कौतुक ग्रामस्थांनी यावेळी केले...
विसर्जन प्रसंगी मार्गावर कोलाड पोलीस व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य मंडळानी केले आभार व्यक्त
खास करून बाप्पाच्या विसर्जनसाठी मकर सजावट व गणपती विसर्जन करण्याकरिता जी सेवा गिरीश परमार यांनी केली... तसेच विसर्जन प्रसंगी मार्गावर कोलाड पोलीस व्यवस्थापनाचे विशेष सहकार्य लाभल्याने मंडळाचे अध्यक्ष राम कळमकर यांनी मंडळाच्या वतीने त्यांचे तसेच गणेश भक्त ग्रामस्थांचे आभार व्यक्त केले...