महाराष्ट्र वेदभुमी

बहुआयामी शिक्षक संदीप दत्तात्रेय वारगे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान


कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे ) 

संदीप दत्तात्रेय वारगे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार

रायगड जिल्हा परिषद शाळा हटाळे तालुका अलिबाग येथील संदीप दत्तात्रेय वारगे यांना महाराष्ट्र शासनाचा क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, यांच्या हस्ते टाटा नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट, नरीमन पॉईंट, मुंबई येथे सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला... या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर, कौशल्य विकास विभाग तथा पालकमंत्री मुंबई उपनगर मंगलप्रभात लोढा, लोकसभा सदस्य अरविंद सावंत, विधान परिषद सदस्य कपिल पाटील तसेच शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, प्रधान सचिव रणजितसिंह देओल, योजना विभाग संचालक महेश पालकर व शिक्षण विभागाचे अधिकारी वर्ग उपस्थित होते... एक लाख दहा हजार रुपये, मानचिन्ह व मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप असलेला हा गौरवशाली पुरस्कार प्रदान करण्यात आल्याने शिक्षक संदीप वारगे यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे...

महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनी पुरस्कार . राज्यभरातील १०८ शिक्षकांना पुरस्कार जाहीर 

समाजाची निःस्वार्थ भावनेने व निष्ठेने सेवा करणाऱ्या शिक्षकांना त्यांच्या अंगीकृत कामाला प्रोत्साहन देण्याच्या व त्यांच्या गुणांचा यथोचित सन्मान करण्याच्या उद्देशाने दरवर्षी महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाकडून शिक्षक दिनी पुरस्कार जाहीर केले जातात. राज्यभरातील १०८ शिक्षकांना पुरस्कार जाहीर करण्यात आलेत...यामध्ये रायगड जिल्ह्यातून श्री.वारगे यांची प्राथमिक विभागातून निवड करण्यात आली आहे... शाळांतर्गत तपासणी, जिल्हास्तरिय मुलाखत व राज्यस्तरीय समितीकडून मुलाखत अशा तीन टप्प्यात पुरस्कार निवड प्रक्रिया झाली...आदिवासी विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून विद्यार्थी गळती कमी केली तसेच कोविड काळात शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमा अंतर्गत "शिक्षणाची वाडी दिवीवाडी" हा उपक्रम राबविला... त्यामध्ये कोविड काळात शाळा बंद असल्या तरी विद्यार्थ्यांचे शिक्षण अविहरत सुरू राहण्यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून अथक प्रयत्न त्यांनी केले होते...त्याचे कौतुक डॉ.किरण पाटील तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सुद्धा केले होते... विद्यार्थ्यांना विज्ञानाची आवड निर्माण व्हावी यासाठी डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम या संस्थेच्या माध्यमातून एकूण १५ विद्यार्थ्यांना उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण या मोहिमेत सहभागी करून घेतले होते... त्यातील तीन विद्यार्थी हे रायगड जिल्हा परिषद शाळेचे होते. अतिशय गरीब कुटुंबातील मोलमजुरी करणे, भंगार गोळा करणे, हमाली करणे अशा पालकांची ही गुणवंत मुले श्री वारगे यांच्या मार्गदर्शनामुळे १२५ उपग्रह निर्मिती व प्रक्षेपण या मोहिमेसाठी तामिळनाडू राज्यातील  पट्टी पुलम येथे पोहोचले.. त्याबद्दल त्यांना चार आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्रे व डॉ. एपीजे कलाम यांचे प्रमाणपत्र प्राप्त झाले आहेत..

शास्त्रज्ञ डॉ. आनंद मेघलिंगम व मार्टिन ग्रुप ऑफ केरळ यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते श्री वारगे सर यांना प्रमाणपत्र देऊन कौतुक 

तसेच याबद्दल एम्. अण्णादुराई (इस्रोचे माझी संचालक) यांच्या उपस्थितीत शास्त्रज्ञ डॉ. आनंद मेघलिंगम व मार्टिन ग्रुप ऑफ केरळ यांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते श्री वारगे सरांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक करण्यात आले आहे...उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र शासन,चंद्रकांत पाटील, रायगड जिल्हाधिकारी डॉ. योगेश म्हसे, रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या उपस्थित जिल्हा मुख्यालय येथे विद्यार्थ्यांसह सन्मानित करण्यात आले आहे...राष्ट्रीय कोविड काळात ऑनलाईन राष्ट्रीय विज्ञान प्रदर्शनात जी.एम.आर.टी. या राष्ट्रीय संस्थेच्या विज्ञान प्रदर्शनात सलग तीन वर्ष परीक्षकाचे काम केले आहे... त्याबद्दल शास्त्रज्ञ डॉ. यशवंत गुप्ता शास्त्रज्ञ डॉ.जी.के.सोळंकी यांचे हस्ते सन्मानीत करण्यात आले आहे... कोविड काळात जेव्हा शाळा बंद होत्या, तेव्हा ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांना मार्गदर्शन मिळावे त्याकरिता त्यांनी अनेक उपक्रम राबविले. त्यामध्ये शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती, झूम मीटिंगद्वारे वर्ग घेणे शिक्षक म्हणून समृद्ध होताना असे उपक्रम घेतले... यामध्ये दहा हजार पेक्षा जास्त शिक्षकांना भाग मिळाला होता...त्याबद्दल डायट पनवेल व डायट अहमदनगर यांनी सुद्धा कौतुक केले आहे...

 अलिबाग तालुक्यातील पहिली आदिवासी डिजिटल शाळा करण्याचा मान त्यांना प्राप्त 

तत्कालीन प्रांत अधिकारी शारदा पोवार व तहसीलदार सचिन शेजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध डॉक्टर आणि प्रशासन यांच्या समन्वयकाचे उत्तम काम श्री वारगे यांनी केले आहे.. त्यावेळच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला आहे...शाळेत विद्यार्थ्यांची पट नोंदणी वाढावी व उपस्थिती टिकावी यासाठी कमी खर्चामध्ये डिजिटल शाळा निर्माण करता येतात यासाठी स्वतः कोणताही खर्च न घेता अनेक शाळा आणि केंद्रामध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन मार्गदर्शन केले आहे...तसेच अलिबाग तालुक्यातील पहिली आदिवासी डिजिटल शाळा करण्याचा मान त्यांना प्राप्त झाला आहे... राज्यस्तरावर देखील गणित विषयाचे प्रशिक्षक म्हणून काम करून विभाग, जिल्हा, तालुका येथे त्यांनी प्रशिक्षकाचे काम केले आहे...तसेच रायगड डायट यांच्यातर्फे जिल्हास्तरावर तंत्रस्नेही शिक्षक म्हणून सुद्धा उल्लेखनीय काम केले आहे... त्यांच्या नवोपक्रमाना जिल्हा पुरस्कार निधी १७५००प्राप्त झाला आहे...सृजनरंग या शासनाच्या अंकामध्ये सरांचा लेख प्रसिद्ध झालेला आहे... वारगे यांच्या या शैक्षणिक क्षेत्रातील कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे... या पुरस्काराबद्दल श्री वारगे यांचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर, शिक्षण संचालक कृष्णकुमार पाटील, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, शिक्षण संचालक महेश पालकर, रा.जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बाष्टेवाड, शिक्षणाधिकारी (माध्य) ज्योत्स्ना शिंदे पवार, उपशिक्षणाधिकारी सुनीता पालकर (माध्य) तथा शिक्षणाधिकारी पुनिता गुरव(प्राथ) उपशिक्षण अधिकारी सुनिल भोपळे, शेडगे गटशिक्षाधिकारी कृष्णा पिंगळा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा गटविकास अधिकारी शुभांगी नाखले, हाऊस ऑफ कलामचे संस्थापक सलीम दाऊद, जनरल सेक्रेटरी मिलिंद चौधरी, महाराष्ट्र राज्य समन्वयक मनीषाताई चौधरी, राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे राज्यकार्य अध्यक्ष विश्वास कोरडे, शाळेच्या मुख्याध्यापिका रश्मी भोपी,  शाळा व्यवस्थापन समिती, जिल्हा पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे जिल्हा समन्वयक जयवंत गायकवाड, सुरेश पाटील, जिल्हयातील सर्व शिक्षक, आजी माजी विद्यार्थी, अनेक सामाजिक संस्था,  अलिबाग लायन्स क्लब, श्रीबाग लायन्स क्लब,  माणुसकी प्रतिष्ठानचे राज्य अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान, अंधश्रद्धा निर्मूलनसमितीचे नितीनकुमार राऊत, निर्मला फुलगावकर, सुरभी संस्थेच्या सुप्रिया जेधे,  ॲड. डॉ. निहा राऊत, अध्यक्ष संजय रावळे,  ॲड. जीविता पाटील सामाजिक कार्यकर्त्या, डायरेक्ट फुटबॉल असोसिएशन महाराष्ट्राचे जनरल सेक्रेटरी दीपक मोकल सर, डॉ.श्रीकांत पाटील निवृत्त मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष, डॉ. के डी पाटील कोकण विभागीय आरएसपी संचालक, डॉ.राज प्रोडक्शनचे डॉक्टर राजेंद्र चांदोरकर,  सचिन कांबळे, अलिबाग प्रेस असोसिएशनचे अध्यक्ष तुषार म्हात्रे, उज्ज्वल भविष्य सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा उज्वला चव्हाण, अंबिका कुटीर योगचे श्री पवार, प्रिझम संस्थेच्या तपस्वी गोंधळी, सक्षम संस्थेचे शार्दुल पाटील व सदभक्ती प्रासादिक भजन मंडळ,  मंगलमूर्ती भजन मंडळ, बेलोशी ग्रामस्थांनी अभिनंदन केले आहे...वारगे हे सध्या जिल्हा समन्वयक, केंद्रप्रमुख, प्राथमिक शिक्षक, डॉ. एपीजे अब्दुल कलाम इंटरनॅशनल फाउंडेशन रामेश्वरम या संस्थेचे कोकण विभाग समन्वयक, अंधश्रद्धा निर्मूलन शाखेचे प्रधान सचिव, उज्वल भविष्य संस्थेचे सचिव,  रायगड जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटनेचे अध्यक्ष तसेच महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त संघटनेचे उपाध्यक्ष, लायन्स क्लब ऑफ श्रीबाग या इंटरनॅशनल संस्थेचे सदस्य म्हणून कार्यरत आहेत...

Post a Comment

Previous Post Next Post