महाराष्ट्र वेदभुमी

32 रायगड लोकसभा मतदार संघातील रोह्यात विविध ठिकाणी शांततेत मतदान




कोलाड :-  प्रतिनिधी 

धाटाव येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड, ४५ मीनिटे मतदान प्रक्रिया बंद .उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद 

32 रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुक प्रक्रियेत रोहा तालुक्यात विविध ठिक ठिकाणी मंगळवारी मतदान शांततेत पार पडले. प्रत्येक निवडणुक केंद्रा बाहेर चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आले होते. कुठे ही कोणत्याही प्रकारचा अनुसूचित प्रकार घडल्याचे वृत्त नाही. स्त्रीपुरुष, तरुण, अनेक वृद्धांनी मतदानाचे हक्क बजावले. या मतदानाच्या वेळी मतदारांमध्ये मोठा आनंददायी उत्साह पाहायला मिळाले. तर धाटाव येथे ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने या ठिकाणी ४५ मीनिटे मतदान प्रक्रिया बंद झाल्याने मतदारांत एकच गोंधळ उडाला होता तर तद्नंतर पुन्हा मतदान प्रक्रिया येथील निवडणुक अधिकारी यांनी सूरू केले तसेच काही ठिकाणी किरकोळ ईव्हीएम मशीन मध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे समजले माञ येथील अधिकारी वर्गाने तत्काळ त्याची दखल घेत मतदारांनी आपले मत देऊन उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद केले.


रायगड लोकसभा निवडणुकीत अनंत गीते आणि सुनील तटकरे यांच्यात मोठी अटीतटीची लढत असल्याचे पाहवयास मिळत होती तर महायुतीचे उमेदवार खा. सुनिल तटकरे यांनी मतदारसंघात केलेला विकासकामे व पुढील काळात मोदी सरकारच्या माध्यमातून योजना व होणारे विकास मुद्यावर विजय होणार असा आत्मविश्वास तटकरे यांना आहे तर अनंत गीते निष्क्रीय नेते 


प्रचारात आघाडी घेतली होती तर इंडिया आघाडीचे उमेदवार यांनी संविधान, महागाई, बेरोजगारी प्रचारात आघाडी घेतली. या लोकसभा निवडणुकीत कोण किती जास्त मताधिक्य घेतात, याची चर्चा सुरू आहे. मुख्यतः अजित पवार गट राष्ट्रवादीची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या, खासदार, महिला व बालविकास मंत्री, आमदार यांनी अनेक प्रचार सभा, घरोघरी प्रचार रॅली घेवून मताधिक्य वाढवण्यासाठी मेहनत घेतली तर शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला माणुस म्हणून घरोघरी प्रचार करण्यात भर दिला. ही निवडणूक देश व राज्यासाठी महत्वपूर्ण असल्याने सर्व पक्षीय नेत्यांनी विजयासाठी कंबर कसून प्रचार केला जात होता.

रायगड लोकसभेचे उमेदवार सुनील तटकरे  यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी मतदानाचा हक्क बजावला तसेच रोहा तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी उस्पूर्त प्रतिसाद देत मतदानाचा हक्क बजावला तर रोहा तालुक्यातील धाटाव येथे मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनमध्ये अचानक तांत्रिक बिघाड झाल्याने मतदारांना तब्बल ४५ मीनिटे मतदान प्रक्रिया बंद झाल्याने ताटकळत उभे राहावे लागले... 

मतदान प्रक्रियेवेळी उपस्थित अधिकाऱ्यांची देखील यावेळी तारांबळ उडाल्याचे समोर आले. यावेळी दोन्ही उमेदवारांच्या कार्यकर्त्यांकडून मतदानासाठी जास्त वेळ मागण्यात आला आहे. दरम्यान, ईव्हीएम मशीनवर आधीच नागरिकांचा विश्वास उडाला आहे. त्यात ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने शासकीय यंत्रणेवर प्रश्न चिन्ह उभा राहिला असल्याचे समजते..

रोहा तालुक्यातील काही मतदान केंद्राबाहेर मतदार बंधू भगिनी तसेच काही जेष्ठ नागरिक यांना  उष्णतेची झळ लागू नये यासाठी बाहेरील प्रांगणात मंडप छाया आणि पाण्याची उत्तम व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले तर रोहा तालुक्यातील कोलाड येथे सखी(महिला संचलित मतदान केंद्र) कोलाड (पेण) यांच्या वतीने उत्तम सजावट करत केंद्रांवर मतदार फुलांच्या रंगांची उधळण तसेच महाद्वार सजविले होते तर मतदान केल्या नंतर मतदार यांचे गुलाब पुष्प देऊन त्यांचे स्वागत करण्यात येत होत त्याचं बरोबर पुगाव सह काही ठिकाणी केंद्रा बाहेर मंडप आणि पाणी तसेच जेष्ठ मतदार यांच्या सह सर्व मतदार यांची काळजी घेतली जात होती तसेच केंद्रांवर अधिकारी तसेच नेमणूक केलेले कर्मचारी वर्ग आणि पोलिस यंत्रणा कोणतेही अनुसूचित प्रकार घडू नये यासाठी उत्तमरीत्या आपली भूमिका चोख बजावत सहकार्य करत होते ..

Post a Comment

Previous Post Next Post