महाराष्ट्र वेदभुमी

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूरमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा




माणगाव प्रतिनिधी सिकंदर आंबोणकर

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूरमध्ये शिक्षक दिन उत्साहात साजरा 

एस.एस.निकम इंग्लिश स्कूल इंदापूरमध्ये डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त दि. ०५/०९/२०२३ रोजी शिक्षक दिन उत्साहात साजरा करण्यात आला... या कार्यक्रमाची रूपरेषा विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या मदतीने आखली... शिक्षक दिन हा आपल्या जीवनातील शिक्षक आणि गुरुच्या स्थानी असलेल्या व्यक्तींना आदर देण्यासाठी साजरा करतात... 

विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करून पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन केला यथोचित सत्कार 

विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा सन्मान करून,त्यांना पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित  सत्कार केला...या दिनाचे औचित्य साधून इयत्ता नववी,दहावीच्या विद्यार्थ्यांनी आजच्या दिवशी इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले...व शिक्षकांची भूमिका पार पाडली...त्यानंतर विद्यार्थ्यांना आलेले अनुभव त्यांनी सांगितले.. व सर्व शिक्षकांचे कौतुक केले... तसेच शाळेतील सर्व विद्यार्थ्यांनी ग्रिटिंग कार्ड बनवून काच-फलकात लावून त्याचे प्रदर्शन भरवण्यात आले... इयत्ता आठवीच्या विद्यार्थिनींनी एक नृत्य सादर केले... या कार्यक्रमाला शाळेच्या मुख्याध्यापिका व एस.एम.सी सेक्रेटरी सौ रंजीता जाधव मॅडम उपस्थित होत्या... प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका सौ संचिता जाधव मॅडम तसेच पूर्व प्राथमिक विभागाच्या इन्चार्ज संपदा पाटील मॅडम उपस्थित होत्या...तसेच शाळेच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सौ. मधुरा खातू मॅडम व शाळेचे को-ऑर्डिनेटर श्री. मनीष देशमुख सर उपस्थित होते...

शाळेतील सर्व शिक्षक वर्ग व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते...उत्साहाच्या वातावरणात हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला...

Post a Comment

Previous Post Next Post