महाराष्ट्र वेदभुमी

ऐनघर ग्रामपंचायतमध्ये भ्रष्टाचार १७ जणांवर गुन्हा दाखल

 


रोहा प्रतिनिधी अनंत म्हसकर 

ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधी अपहार प्रकरणी सर्व आरोपींना लवकरच अटक करण्याची मागणी

नागोठणे विभागातील अत्यंत श्रीमंत ग्रामपंचायत अशी ओळखल्या जाणाऱ्या ऐनघर ग्रामपंचायतमध्ये सरपंच ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक सदस्य यांनी संगमत करून पैसे काढल्याची तक्रार महादेव मोहिते माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते यांनी केली आहे.. ग्रामनिधीच्या अपहार प्रकरणी सरपंचासह तत्कालीन दोन ग्रामविकास अधिकारी व सदस्य मिळून १७ जणांवर नागोठणे पोलीस ठाण्यात बुधवार दिनांक ६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे...तरी ऐनघर ग्रामपंचायतिच्या ग्रामनिधी अपहार प्रकरणी सर्व आरोपींना लवकरच अटक करण्यात येईल असे संकेत नागोठणे पोलीस ठाण्याचे सपोनि संदीप पोमन यांनी दिले..


ऐनघरचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते महादेव मोहिते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश 

गुन्हा दाखल करण्यात आलेल्या ऐनघर ग्रामपंचायतच्या तत्कालीन पदाधिकारी सरपंच चंद्रकांत शिद, ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर, ग्रामसेवक अनंत मेश्राम, तत्कालीन प्रभारी सरपंच दिनेश जाधव, व तत्कालीन सर्व ग्रामपंचायत सदस्य असे एकूण १७ जणांचा समावेश आहे याप्रकरणी ऐनघरचे माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्ते महादेव मोहिते यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे.. ऐनघर ग्रामपंचायतीमध्ये १ जानेवारी २०१८ ते ३१ डिसेंबर २०२० या कालावधीत तत्कालीन सरपंच सदस्य ग्रामविकास अधिकारी व ग्रामसेवक यांनी १५ लाख २४ हजार २०९ रुपयांचा भ्रष्टाचार केला असल्याचे उघड झाल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायनिर्णय व आदेशानुसार तसेच नंतर रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार रोहा पंचायत समितीचे प्रभारी गटविकास अधिकारी कुलदीप बोंगे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार नागोठणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...


गुन्हा हा गुन्हाच आहे तो एक रुपयाचा भ्रष्टाचार असो अथवा करोडचा तो भ्रष्टाचारच

महादेव मोहिते यांच्या म्हणण्यानुसार १५ लाख २४ हजार २०९ रुपये ही रक्कम समाधानकारक नसून रकमेचा तपशील हा १ कोटी २० लाख रुपयाचा आहे सरपंच ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक व सर्व सदस्य यांना वाचवण्यासाठी ही अपुरी रक्कम लिहिली असल्याचे सांगण्यात येत आहे...गुन्हा हा गुन्हाच आहे तो एक रुपयाचा भ्रष्टाचार असो अथवा करोडचा तो भ्रष्टाचारच आहे..ही रक्कम अपुरी लिहिली हा गुन्हा केल्या विरुद्ध १४ -०९-२०२३ रोजी हायकोर्टाने दिलेली मुदत संपल्यानंतर मी मुंबई उच्च न्यायालयात अवमान याचीका दाखल करणार आहे जर पंचायत समिती रोहा यांनी हा गुन्हा संपूर्ण रकमेचा गुन्हा दाखल केला नाही तर या गुन्ह्याबाबत संपूर्ण चौकशी व्हावी असे आदेश हायकोर्टातून करून घेणार आहे 

ऐनघर येथे एक वर्षांमध्ये एवढा घोळ तर मग धाटाव ग्रामपंचायतमध्ये तीस वर्ष काय केले असेल? 

तसेच हेच ग्रामविकास अधिकारी दीपक चिपळूणकर यशवंत ग्रामपंचायत धाटावमध्ये तब्बल गेली तीस ३० वर्ष येथेच ठीया मांडून आहेत...आज मात्र तोंडामध्ये बोट घालत धाटाव ग्रामस्थांमध्ये अशी चर्चा चालू आहे की ऐनघर येथे एक वर्षांमध्ये एवढा घोळ तर मग धाटाव ग्रामपंचायतमध्ये तीस वर्ष काय केले असेल जर शासकीय अधिकारी असेच भ्रष्टाचार करत राहिले तर कुणावर विश्वास ठेवणार अशा भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांना शासनाने त्वरित शासन करावे अशी विनंती..

Post a Comment

Previous Post Next Post