जिल्ह्यात १ लाख २ हजार खासगी तर २७१ सार्वजनिक मंडळाचे गणपती
अलिबाग (जिमाका) दि. ९:-- जिल्ह्यात १९सप्टेंबर पासून गणेशोत्सव हा सण मोठया प्रमाणात उत्साहाने साजरा होणार आहे...जिल्ह्यात १लाख २हजार खासगी तर २७१ सार्वजनिक मंडळाचे गणपती असणार असून पोलीस व जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उत्सवासाठी गावी परतणाऱ्या कोकण वासियांच्या सुविधांसाठी यंत्रणा सतर्कता राखत वाहतूक कोंडी होऊ नये या दृष्टीने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर अवजड वाहनांना वाहतूक बंदीचे व वाहतूक नियोजनाचे निहाय आदेश निर्गमित करण्यात आले आहेत...जिल्ह्यातील गणेशोत्सवसाठी जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे , जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घाडगे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ भरत बास्टेवाड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील शासकीय यंत्रणा सुसज्ज झाली असून पोलीस, नगरपालिका, ग्रामपंचायत यासह विविध शासकीय विभागांनी गणेशोत्सव आनंदात व सुव्यवस्थित होण्यासाठी उपाययोजना व नियोजन पूर्ण केले आहे....
जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित
गणेशोत्सव २०२३ शांततेत पार पाडण्याच्यादृष्टीने कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी जिल्हा नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे जिल्हास्तरीय शांतता कमिटी बैठक आयोजित करण्यात आली आहे...जिल्ह्यात गणेश उत्सवाचे पूर्वतयारी जोरात सुरू असताना प्रशासन देखील गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था सुव्यवस्थित राखणे, गणेश भक्तांना योग्य ती सुविधा प्राप्त करणे, कोकणामध्ये खास गणेशोत्सवासाठी परतणाऱ्या चाकरमान्यांसाठी प्रवास सुखकर व्हावा गणेश भक्तांचा प्रवासात कोठेही अडचण न येता प्रवास सुखकर होण्याच्या दृष्टिकोनातून पेट्रोलिंग, फिक्स पॉईन्ट,१० सुविधा केंन्द्र,१० क्रेन, अंम्ब्युलन्स एकूण वॉर्डन ४५० व होमगार्ड १०० नेमण्यात आले आहे..
आपत्कालीन वाहन दुरुस्ती, टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा वैदयकीय कक्ष, अम्ब्युलन्स सेवा, मोफत वैदयकिय उपचार
खारपाडा, खारपाले, वाकण, कोलाड, इंदापुर ,माणगाव , लोणेरे, महाड, महाड एम.आय.डी.सी.,पोलादपुर या ठिकाणी सुविधा केंद्रावर पोलीस मदत केंन्द्र,आपत्कालीन पोलीस मदत टोईंग व्हॅन, क्रेन, वाहन दुरुस्ती कक्ष , आपत्कालीन वाहन दुरुस्ती व टायरमध्ये हवा भरण्याची सुविधा असेल...वैदयकीय कक्ष, अम्ब्युलन्स सेवा, मोफत आपत्कालीन वैदयकिय उपचार सुविधा, बालक आहार कक्ष व मोफत चहा, बिस्कीट, सरबत, पाणी, ओ.आर.एस. आणि महिलांसाठी फिडींग कक्ष उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत... येथे महामार्ग चौपदरीकरणाचे प्रगतीचे फोटो गॅलरी द्वारे प्रदर्शन करण्यात येईल...
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने देण्यात आले निहाय आदेश
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्र६६ वर अवजड वाहनांना बंदीच्या दृष्टीने निहाय आदेश देण्यात आले आहेत. १६ टन व त्यापेक्षा अधिक वजन आहे अशा वाहनांना हे बंदी आदेश लागू राहतील. यानुसार १६ सप्टेंबर २०२३ रात्री १२ वाजेपासून ते १९ सप्टेंबर २०२३ रात्री बारा वाजेपर्यंत तसेच २३ सप्टेंबर २०२३ सकाळी ८ वाजल्यापासून ते २५सप्टेंबर २०२३ रात्री ८ वाजेपर्यंत तसेच २८ सप्टेंबर २०२३ सकाळी ८ वाजेपासून ते ३० सप्टेंबर २०२३ रात्री ८ वाजेपर्यंत आदेश अंमलात राहणार आहेत...यासह २०, २२ , २६ व २७ सप्टेंबर २०२३ रोजी दिवसा बंदी घातण्यात आली असून सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत राष्ट्रीय महामार्गावरून अवजड वाहनांना वाहतूक करता येणार नाही...
अनंतचतुर्थी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद होणार सण साजरा
या गणेशोत्सवाची सांगता दीड दिवस, पाच दिवस ,सात दिवस अशा विविध दिवशी तसेच दहा दिवसाचे २८ सप्टेंबर २०२३ रोजी आणि २१ दिवसाचे गणपती १० ऑक्टोबर २०२३ रोजी यानुसार विसर्जनाचे दिवशी होईल...यासाठी सार्वजनिक गणेश मुर्ती विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात आले आहेत...यातील समुद्रावर ५२ गणेशमुर्ती विसर्जन, खाडीमध्ये १०५ गणेशमुर्ती विसर्जन, नदीमध्ये २४४ गणेशमुर्ती विसर्जन, तलावामध्ये १०० गणेशमुर्ती विसर्जन व इतर ठिकाणी ९४ गणेशमुर्ती विसर्जन होणार आहे...या दृष्टीने स्थानिक स्वराज्य संस्था व शासनाकडून सुविधा नियोजन व उपायोजना करण्यात येत आहे...जिल्हयात २७१ सार्वजनिक गणपती व १,०२,५८१ खाजगी गणपती स्थापना होणार आहे... दि २८ रोजी अनंतचतुर्थी गणपती विसर्जनाच्या दिवशी मुस्लीम बांधवाचा ईद-ए-मिलाद हा सण साजरा होत आहे...जिल्हयात नमाज पठणाचा कार्यक्रम होणार असुन विसर्जनाच्या मिरवणुका काढण्यात येणार आहेत...त्याकरीता पोलीस ठाण्याच्या हददीत स्वतंत्र बंदोबस्त लावण्यात येणार आहे...
