सोगांव - अब्दुल सोगावकर :
अलिबाग पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना केली अटक,
अलिबाग तालुक्यातील सोगाव येथे मंगळवार दि. ७ मे २०२४ रोजी 'तुम्ही बाहेरचे' असे फिर्यादीने सांगितल्याचा राग मनात धरून आरोपी क्र. १ ते ७ यांनी फिर्यादी यांच्या घरात घुसून फिर्यादी व त्यांची पत्नी, भाऊ तसेच मुलगा यांना काठी, बॅट, स्टंप यांनी हातावर व हाताच्या उजव्या अंगठ्यावर मारहाण केल्यामुळे आरोपींविरुद्ध अलिबाग पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे...
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ मे २०२४ रोजी रात्री ८:३० वाजता च्या सुमारास फिर्यादी यांचा पुतण्या याने आरोपी क्र. १ यांना 'तुम्ही बाहेरचे' असे बोलला, याचा राग मनात धरून आरोपी क्र.१ याने गैरकायद्याची मंडळी जमा करून आरोपी क्र.१ व तिचा पती आरोपी न.२ व त्याचा दीर आरोपी नं.४,५,६,७ सर्व राहणार मु.सोगाव, पो.मापगाव, ता.अलिबाग यांनी फिर्यादी व त्यांच्या पत्नी, भाऊ व मुलगा यांना घरात घुसून काठी, बॅट, स्टंप यांनी हातावर व हाताच्या उजव्या अंगठ्यावर उपटी मारून दुखापत केली...
याबाबत अलिबाग पोलीस ठाणे येथे गु.र.नं.११९/२०२४ भा.दं.वि.क.३२४,१४३,४५२,५०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सपोनि/भारत फार्णे हे करीत आहेत...
