उरण दि 26 (विठ्ठल ममताबादे)
वनवासी कल्याण आश्रमाच्या १९ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष माळरानावर कार्यक्रम केला सूरू
वनवासी कल्याण आश्रम व हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारक समितीच्यावतीने दिनांक २५/९/२०२३ रोजी अक्कादेवीच्या माळरानावर अभिवादन कार्यक्रम झाला...२५ सप्टेंबर १९९८ साली वनवासी कल्याण आश्रमाच्या १९ कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष माळरानावर कार्यक्रम सूरू केला होता...२०१८ रोजी हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारक समिती स्थापन करून माळरानावर नाग्या दादाचा पुतळा उभा केला...दरवर्षीप्रमाणे आमदार महेश बालदी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसमवेत श्रद्धांजली अर्पण करून या भागातील विकासासाठी कायम कटिबध्द आहे असे म्हटले...तर जनजाती कातकरी विविध सामाजिक संस्था व कार्यकर्ते व सारसन ग्रामस्थ यांनी मशाल मिरवणूक आणली होती...भगवान नाईक यांनी समाज आपल्या विकासासाठी एकजूट झाला पाहिजे याबाबत मार्गदर्शन केले...तर वनवासी कल्याण आश्रमाचे क्षेत्र हितरक्षा सहप्रमुख युवराज लांडे यांनी शिका कौशल्य प्राप्त करा...आपल्यामध्ये असलेले गुण विकसित करून शासकिय नोकऱ्या मिळावा...पूर्वजांचे स्मरण करून आपली संस्कृती परंपरा जपली पाहिजे व अन्य धर्मियांपासुन सुरक्षित राहिलं पाहिजे कारण आपला इतिहास महान आहे...असे सांगितले...त्यानंतर कातकरी नृत्य सादर करण्यात आले... महीला व मुलांनी आपले पारंपरिक पद्धतीमध्ये पेहराव करून नृत्य सादर केले...
जागतिक फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून केमिस्ट असोसिएशन तर्फे उपस्थित बांधवांना मेडीसिन घेणे विषयक दिली माहिती
जागतिक फार्मसिस्ट डे चे औचित्य साधून उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे उपस्थित बांधवांना मेडीसिन घेणे विषयक माहिती आणि कृमिनाशक गोळ्या वाटप करण्यात आले...उरण तालुक्यातील ज्या वाड्यावरती शाळा आहेत तेथील मुख्याध्यापकांना हुतात्मा नाग्या कातकरी यांचे तसबीर देण्यात आले .१००० चे वर जनजाती समाज संपुर्ण जिल्ह्यातून आला होता...आलेल्या जनसमुदाय स्नेह भोजन करून हा कार्यक्रम संपला..
सन्माननीय मान्यवर यांच्याकडून हुतात्मा नाग्या कातकरी यांना दिली मानवंदना
स्मृतिदिनानिमित्त आदिवासी वाडीवर,आरएसएस जिल्हा अध्यक्ष अविनाश म्हात्रे, बी जे पी रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी ,उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर,उद्योगपति राजाशेठ, उरण पूर्वविभाग प्रमुख शशिकांत पाटील, सारडे गावातील सरपंच रोशन पाटील व ईतर सन्माननीय मान्यवर यांच्याकडून हुतात्मा नाग्या कातकरी यांना मानवंदना देण्यात आली...या कार्यात अक्कादेवी ग्रामस्थ, चिरनेर ग्रामस्थ, हुतात्मा नाग्या महादू कातकरी स्मारक समिती,वनवसी कल्याण आश्रमाचे जील्हासचीव रवींद्र पाटील,तालुका अध्यक्ष मनोज ठाकूर,सचिव विश्वनाथ कातकरी,उपाध्यक्ष अजित भींडे, सहसचिव कुणाल शिसोदिया,रमेश फो, दीपक गोरे,मीराताई पाटील,रोशन कातकरी,सुनंदा कातकरी,बेबीताई कातकरी तसेच अनेक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली...