दहा दिवसांचे विराजमान गणपतीचे सद्भावे पुजन व दर्शन दर्शनाच्या निमित्ताने आदरणीय बसवेकर सरांशी चर्चा
पनवेल: राज्य माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय श्री सुभाष बसवेकर सर यांच्या निवासस्थानी विराजमान बाप्पाचे रघुनाथ कडू (अध्यक्ष: माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन रायगड) व किरण मोरे (अध्यक्ष: माहिती अधिकार कार्यकर्ते फेडरेशन रोहा.)या दोघांनी त्यांच्या निवासस्थानी दहा दिवसांचे विराजमान गणपतीचे सद्भावे पूजन करून दर्शन घेतले...या दर्शनाच्या निमित्ताने आदरणीय बसवेकर सरांशी मनमोकळेपणाने चर्चा करण्यात आली...
हिंदू-मुस्लिम सण एकाच दिवशी.माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५च्या अनुषंगाने साजरा करण्याचे निवेदन
सामाजिक समस्या व सप्टेंबरच्या २८ तारखेला माहिती अधिकार कायदा लागू झाला...त्याचे सर्व शासकीय कार्यालयातून राज्य माहिती अधिकार दिन म्हणून साजरा करण्यात येतो...तर यावेळी हिंदू व मुस्लिम सण एकाच दिवशी येत आहेत...ते म्हणजे अनंत चतुर्दशी व ईद यांना शासकीय सुट्या जाहीर झाल्याने २८ तारखेला हा दिन साजरा होणार नाही, मात्र माहिती अधिकार कायदा अधिनियम २००५च्या अनुषंगाने हा दिन विशेष असल्याने व त्याचे महत्त्व कमी होऊ नये याकरिता २८सप्टेंबर ऐवजी २७ सप्टेंबर किंवा २९ सप्टेंबर या दिवशी साजरा करण्यात यावा या आशयाचे निवेदन दिले असल्याचे जिल्हा अध्यक्ष कडू व तालुका अध्यक्ष मोरे यांच्या कडून सांगितले...
निवेदन पूर्तता बाबत बसवेकर सरांनी रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना दिले धन्यवाद...
तर या संदर्भात आदरणीय बसवेकर सरांनी काही दिवसांपूर्वी सर्व प्रमुख पदी असणाऱ्या कार्यकर्त्यांना तशा सूचना दिल्या होत्या...त्याची पूर्तता केल्याबद्दल सरांनी रायगड जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना धन्यवाद दिले...तसेच याव्यतिरिक्त इतर काही समस्या मा़डल्या असता त्या जाणून घेवून त्यावर योग्य मार्गदर्शन केले...
गुरुशिष्यांची गणरायाच्या निमित्ताने बाप्पानी घडवून आणली भेट रघुनाथ कडू व किरण मोरेंची प्रतिक्रिया
यामुळे समाधानकारक वातावरणात गुरुशिष्यांचे गणरायाच्या निमित्ताने भेट घडवून बाप्पाने आणली असल्याची प्रतिक्रिया कडू व मोरे यांनी दिली...यावेळी बसवेकर सरांचे जेष्ठ चिरंजीव आदित्य व लहान अभिषेक या भेटी दरम्यान उपस्थित होते...यानिमित्ताने दोन्ही कार्यकर्त्यांचे बसवेकर कुटूंबीयांकडून यथोचित स्वागत व पावूणचार करुन आभार मानले...