उरण तालुक्यातील आक्कादेवी आदिवासी वाडीवर केमिस्ट असोसिएशन तर्फे फार्मसिस्ट डे साजरा
दरवर्षी उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे फार्मसिस्ट डे साजरा केला जातो...यावर्षी फार्मसिस्ट डे उरण तालुक्यातील आक्कादेवी आदिवासी वाडीवर साजरा करण्यात आला...हुतात्मा नाग्या कातकरी स्मृतिदिन वनवासी कल्याण आश्रम उरणतर्फे साजरा केला जातो...या कार्यक्रमासाठी १०००च्या वर आदिवासी बांधव उपस्थित असतात...
असोसिएशन तर्फे उरण तालुक्यातील सर्व फार्मसिस्ट बंधूंचा, कर्मचाऱ्यांचा मेडिकलमध्ये जाऊन सत्कार
या सर्व अदिवासी बांधवांना उरण तालुका केमिस्ट असोसिएशनतर्फे औषधे घेण्याविषयी माहिती देण्यात आली..आणि त्यांना कृमिनाशक गोळ्या वाटप करण्यात आल्या...तसेच पुढे आदिवासी बांधवांसाठी वाड्यांवर असोसिएशनतर्फे कॅम्प आयोजित करण्याचे ठरविण्यात आले.. अशा प्रकारे संघटनेने समाजाविषयी बांधिलकी व्यक्त केली...यावेळी रायगड जिल्हा पदाधिकारी तसेच वनवासी कल्याण आश्रमचे अध्यक्ष मनोज ठाकूर,उरण तालुका केमिस्ट असो.अध्यक्ष उमाकांत पानसरे, सचिव राजेश्वर गावंड, सदस्य, फार्मसिस्ट बाळू घालवत आणि अभिनय पाटील उपस्थित होते...उरण तालुका केमिस्ट असोसिएशन तर्फे उरण तालुक्यातील सर्व फार्मसिस्ट बंधूंचा, कर्मचाऱ्यांचा मेडिकलमध्ये जाऊन सत्कार देखील करण्यात आला...
