गेली दहा दिवसापासून विराजमान झालेला गणपती बाप्पाला भक्तिभावाने निरोप
नवी मुंबई नेहरू येथे गुरुवार दिनांक २८ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्थीच्या गणपतीचे विसर्जन अतिशय जल्लोषामध्ये व भक्तीमय वातावरणात गणरायाला निरोप देत साजरे करण्यात आले... गणरायाला निरोप देताना उपस्थित भाविकांचे अंतर्मन भरून आल्याचे चित्र पाहायला मिळाले... गेली दहा दिवसापासून विराजमान झालेला गणपती बाप्पा याला दहा दिवसांनी निरोप देताना सर्व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.. तसेच अतिशय शिस्तबद्ध व सुव्यवस्था रित्या विसर्जन या सर्व गणपती बाप्पांचे मनोभावे करण्यात आले...
अक्षय कदम यांनी गणरायाच्या मखरामध्ये या चोर दहीहंडीचे अतिशय छान व सुंदररित्या केली होती मांडणी...
सेक्टर १७ या ठिकाणी अक्षय कदम यांनी आपल्या गणरायाची प्राणप्रतिष्ठा करताना बाजूला मनसेच्यां चोर दहीहंडीची मांडणी करून गणरायाला त्यामध्ये विराजमान केले होते... भारतीय संस्कृतीप्रमाणे दहीहंडी हा एक मोठ्या प्रमाणात सण साजरा केला जातो...आणि त्यासाठी सराव दहीहंडीचे आयोजन महाराष्ट्र नवनिर्माण सेना नवी मुंबई नेरूळ यांच्याकडून नवी मुंबईतील गोविंदा पथकांसाठी करण्यात आले होते.. आणि त्याचवेळी गोविंद पथकाने मोठ्या संख्येतून मिळून या ठिकाणी हजेरी लावली होती...आणि त्याचे प्रत्यक्ष दर्शन म्हणून अक्षय कदम यांनी आपल्या गणरायाच्या मखरामध्ये या चोर दहीहंडीचे अतिशय छान व सुंदररित्या मांडणी केली होती...आणि हे दृश्य पाहताना गणराया व चोर दहीहंडी यांचा मेळ अतिशय मनाला मोहून टाकणारे असे दृश्य अनुभवायला मिळाला.. चोर दहीहंडीचे प्रदर्शन आणि गणरायाचे दर्शन पाहण्यासाठी समस्त गणेश भक्तांनी तसेच इतर नागरिकांनी मोठ्या संख्येने याठिकाणी पाहण्यासाठी हजेरी लावली होती...
मनसे कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित भाविकांनी गणरायाला भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत दिला निरोप
गेले दहा दिवसापासून विराजमान असणाऱ्या गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी नेरूळ मधून सेक्टर १६ येथे अक्षय कदम यांच्या गणरायाच्या मिरवणुकीसाठी मनसेचे कार्यकर्ते अभिजीत देसाई,अनुष्का देसाई, मंगेश चौगुळे प्रियेश सावंत ,जयेश भोईर जान्हवी भोईर तेसेच मनसेच इतर कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते... सर्व उपस्थित भाविकांनी गणरायाला भक्तिभावाने ढोल ताशांच्या गजरात नाचत गाजत निरोप दिला....
गणेशभक्तांनी पोलीस प्रशासनाला योग्य तो प्रतिसाद देऊन गणरायाचे केले विसर्जन
संपूर्ण नेरुळमध्ये जागोजागी पोलीस बंदोबस्त करण्यात आला होता..तसेच गणेशभक्तांनी पोलीस प्रशासनाला योग्य तो प्रतिसाद देऊन गणरायाचा विसर्जन सोहळा शांतता व सुव्यवस्था राखून सहकार्य केले त्याच बरोबर संपूर्ण नेरूळ येथील दहा दिवसांच्या गणरायाला सर्व भाविकांनी भावपूर्ण निरोप दिला...