कोलाड प्रतिनिधी (श्याम लोखंडे)
ह.भ.प.नारायण महाराज वयोवृद्धापकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी अल्पशा आजाराने अचानक निधन
श्री संत ज्ञानेश्वर सत्संग वारकरी संप्रदाय आळंदी पायी दिंडीचे प्रणेते, वारकरी सांप्रदाय संभे ते रोहा आळंदी पायी दिंडीचे संस्थापक ह.भ.प.नारायण महाराज महाबळे यांचे पाले बुद्धक येथील त्यांच्या राहत्या निवासस्थानी बुधवारी २७ सप्टेंबर रोजी अल्पशा आजाराने तसेच वयोवृद्धापकाळामुळे वयाच्या ८३ व्या वर्षी अचानक निधन झाल्याने महाबले परिवार तसेच वारकरी संप्रदाय मंडळात शोककळा पसरली आहे...
संत परंपरेचा वारसा जपत रोहा तालुक्यातून गेली २५ वर्ष संभे ते आळंदी या पायी दिंडी वारीची केली स्थापना
कोकणात रायगड जिल्हा रोहा तालुक्यातील कोलाड विभागात संत परंपरेचा वारसा जोपासणारे तसेच रोहा तालुक्यातून गेली २५ वर्ष संभे ते आळंदी या पायी दिंडी वारी आदी दिडींची स्थापना करून सातत्याने आजही दिंडी त्यांचे नेतृत्वाखाली अविरतपणे चालू आहे...रायगड जिल्हापरिषदेने त्यांना वारकरी संप्रदाय चळवळ आध्यत्मिक तथा धार्मिक सेवेचा वारसा जोपासत असल्याने रायगड भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले...असुन वारकरी सांप्रदायाने त्याचबरोबर विभागातील सामजिक संस्थानी सुद्धा त्यांचा सत्कार केला आहे...
धार्मिक व आध्यात्मिक वारकरी सांप्रदाय सेवेतून प्रवचनाद्वारे वारकरी व तरुणाना दिला सुखी जगण्याचा मार्ग
वारकरी संप्रदायाबरोबरच सामजिक चळवळ म्हणून शेतकऱ्यांचे तथा कुणबी समाज नेते माजी आमदार,स्व.पा. रा. सानप यांचे खंदे समर्थक तर डाव्या विचारसरणीयने ते हस्तक होते... त्यामुळे शे.का.प.ची विचारसरणीतून त्यांचे शेतकरी व शेतमजूर कष्टकरी यांना सखोल मार्गदर्शन करत असत... धार्मिक आणि आध्यात्मिक वारकरी सांप्रदाय सेवेतून त्यांनी आपला प्रवास केला तर प्रवचनाचे माध्यमातून अनेक वारकरी व तरुणाना त्यांनी सुखी जीवन जगण्याचा मार्ग दाखविला...त्यामुळे त्यांचे जाण्याने संप्रदाय वारकरी मंडळीत विचाराची फार मोठी पोकळी निर्माण झाली आहे...
वारकरी संप्रदायासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित
कोलाड विभाग तसेच संभे पंचक्रोशीतील आध्यात्मिक परंपरेचा वारसा जोपासणारे तसेच श्री संत ज्ञानेश्वर सत्संग वारकरी संप्रदाय संभे ते आळंदी पायी दिंडीचे संस्थापक रायगड भूषण ह.भ.प.नारायण बाबा महाबळे यांच्या निधनाची वार्ता समजताच त्यांच्या अंत विधीसाठी त्यांचे नातलग तसेच रायगड जिल्हयातील वारकरी संप्रदायासह सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, क्षेत्रातील जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होते...
दशक्रिया विधी शुक्र ६ ऑक्टो व उत्तर कार्य तेरावे रवि ८ ऑक्टो रोजी होणार त्यांच्या राहत्या निवासस्थानी
रोहा तालुक्यातील कुणबी समाजोन्नती संघ रायगडचे सरचिटणीस तसेच ओबीसी नेते व शेकाप रोहा तालुक्याचे नेते शिवराम महाबळे यांचे कै.नारायण महाराज हे थोरले बंधू होते.. त्यांच्या पश्चात एक मुलगा,तीन मुली,भाऊ,जावई,नातवंडे,पुतणे, तसेच मोठे महाबळे परीवार असून त्यांचे पुढील दशक्रिया विधी शुक्रवारी ६ ऑक्टो व उत्तर कार्य तेरावे रविवारी ८ ऑक्टो रोजी त्यांच्या राहत्या निवासस्थानी मौजे महाबळे पाले येथे संपन्न होणार आहेत...