रोहा दि.२९ सप्टें. विशेष प्रतिनिधी
अनंत चतुर्दशीच्या एक हजार बाप्पांना भावपुर्ण निरोप.
रोहा तालुक्यात अनंत चतुदर्शीच्या एक हजार बाप्पांचे भावपुर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले...यामध्ये ०५ सार्वजनिक गणपती होते... अधूनमधून येणाऱ्या पावसाच्या सरींचा आनंद घेत टाळ, मॄदुंग आणी ढोल, ताशांच्या गजरात भक्तगणांनी "पुढच्या वर्षी लवकर या" म्हणत आपल्या आवडत्या बाप्पाला निरोप दिला...यावेळी विसर्जन मिरवणुकांचा जल्लोष पाहण्यासाठी रोहा बाजारपेठेत तुडुंब गर्दी झाली होती...
गणपतींच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रोहा बाजारपेठेत उसळली गर्दी
सार्वजनिक गणपतीं मंडळांची विसर्जनासाठीची लगबग दुपार नंतर सुरू झाली होती...मोरे आळी, अंधार आळी आणि धनगर आळी असे एकामागुन एक खाजगी गणपती विसर्जनासाठी नदी किनारी काढण्यात आले...रोहयाचा प्रसिद्ध एक गाव एक सार्वजनिक गणपती, जय गणेश मंडळाचा भुवनेश्वरचा राजा, तसेच शहरातील शेडगे बंधु, साळवी बंधु आदिं गणपतींच्या भव्य विसर्जन मिरवणुका पाहण्यासाठी रोहा बाजारपेठेत गर्दी उसळली होती...
गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर योग्य ती व्यवस्था आणी विद्युत रोषणाई
यांच्यासह रमेश साळवी, वखारदार बंधु, दिपक कोरपे, पिळवणकर, अपेंद्र बाबू सावंत, संजय अवसरकर, मोकल, दिपक गोलिपकार, बांदल परिवार, राजू सकपाळ, अमित उकडे आदी उत्कॄष्ट सजावटीच्या भव्य गणेश मूर्त्यांचे त्या त्या आळींतील इतर गणपतींसह मिरवणुकीने वाजत गाजत, लेझिम, टाळ मॄदुंग आणी ढोल ताशाच्या गजरात विसर्जन करण्यात आले...हातगाडी तसेच खाजगी वाहनांनी विसर्जना साठी निघालेल्या बाप्पांना पाहण्यासाठी मोठा जनसमुदाय लोटला होता...गणपती विसर्जनासाठी नगरपालिकेतर्फे विसर्जन स्थळांवर योग्य ती व्यवस्था आणी विद्युत रोषणाई करण्यात आली होती...
अनुचित प्रकार घडु नये यासाठी रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी ठेवला चोख बंदोबस्त
भक्तगणांनी गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या असे गजर करीत आपल्या बाप्पांचे कुंडलिका नदीपात्रात भावपुर्ण आणी भक्तीमय वातावरणात रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले.. यावेळी कोण्ताही अनुचित प्रकार घडु नये यासाठी रोहा पोलिस निरीक्षक प्रमोद बाबर यांनी चोख बंदोबस्त ठेवले होते...रोहा तालुक्यात ५ सार्वजनिक तर ९९८ खाजगी गणरायांचे विसर्जन करण्यात आले असल्याची माहीती रोहा पोलिस ठाण्याचे जयेंद्र पेढवी यांनी दिली..
चौकट-: बाजारपेठेत फटाक्यांचे प्रदूषण
पर्यावरण पूरक सण साजरे व्हावेत यासाठी मोठ्या प्रमाणात जनजागृती होत असताना विसर्जन मिरवणुकीतिल फटाक्यांच्या अतिषबाजीने गुरूवारी रोहा बाजारपेठ प्रदूषित झाली... शेडगे बंधू व अन्य काही खाजगी गणपतींनी मिरवणुकीत फटाक्यांची सररास आतषबाजी केल्याने मिरवणुका पाहण्यासाठी सराsssस उसळलेल्या गर्दीला धुर आणि वायू प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागला..